मुंबई, 7 मे : लॉकडानमुळे सध्या सर्वांनाच घरी बसावं लागलं आहे. मात्र यामुळे हातावर पोट असलेल्या मजूर वर्गाचे सर्वाधिक हाल झाले आहे. अनेकजणांकडे काम नाही त्यामुळे पैशांची चणचण आहे आणि त्यामुळे त्यांना उपासमारीचाही सामना करावा लागत आहे. अशा लोकांसाठी सलमान खान पुन्हा एकदा देवदूत बनून आला आहे. 25 हजार मजूरांना राशन पुरवल्यानंतर भूकेल्यांसाठी सलमाननं Being Haangryy नावानं फूड ट्रकची सुरुवात केली आहे. जो त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचून त्यांना अन्न पुरवणार आहे.
सलमान खान कोरोना व्हायरसमुळे लोकांवर कोसळलेल्या संकटात त्यांच्यासोबत उभा राहिला आहे. सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या प्रकारची मदत करणाऱ्या भाईजाननं पुन्हा एकदा सर्वांची मनं जिंकली आहे. त्यानं Being Haangryy नावाच्या एका नव्या उपक्रमाची सुरुवात केली असल्याचं बोललं जात आहे. हा फूड ट्रक उपासमारीचा सामना करणाऱ्या या लोकांना राशन पोहोचवण्यासाठी मदत करेल. सलमानच्या या कृतीचं सोशल मीडियावर खूप कौतुक केलं जात आहे. मात्र सलमाननं याबाबत कोणतही स्पष्टीकरण दिलेलं नाही.
'रामायण' हा सर्वाधिक पाहिलेला शो नाही? सर्वात मोठा रेकॉर्ड वादाच्या भोवऱ्यात
याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात एका फूड ट्रकवर Being Haangryy असं लिहिलं आहे आणि काही कर्मचारी रागेच उभ्या असलेल्या लोकांना रोजच्या जेवणासाठी लागणाऱ्या उपयोगी वस्तू देताना दिसत आहेत. या व्हिडीओच्या सुरुवातीला हा ट्रक मुंबईतील खार रोड रेल्वे स्टेशनच्या बाहेर उभा असलेला पाहायला मिळत आहे.
Thank you @Beingsalmankhan bhai for being there and silently doing something which is needed,service to mankind is service to the almighty!!!Jai Ho!!! I shall surely try and do my bit following the lockdown norms and request our Fanclub family to practice the same #BeingHaangryy pic.twitter.com/nOeQncO9Er
— Rahul.N.Kanal (@Iamrahulkanal) May 6, 2020
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओनंतर सर्वजण सलमानच्या कौतुक करत आहेत आणि त्याच्या कुटुंबाला आशीर्वाद देताना दिसत आहेत. अनेक युजर्सचं म्हणणं आहे की, सलमान खान फक्त रिल लाइफमध्येच नाही तर रिअल लाइफमध्ये बेस्ट हिरो आहे. याआधी सलमानच्या फार्म हाऊसवरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात सलमान खान स्वतः बैलगाड्यामुळे जीवनावश्यक वस्तू भरताना दिसला होता.
(संपादन- मेघा जेठे.)
कधीकाळी एकता कपूरशी लग्न करायला तयार झाला होता करण जोहर, पण...
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Coronavirus, Salman khan