ऋषी कपूर यांनी धडाक्यात लावलं होतं लेकीचं लग्न, 14 वर्षांपूर्वी असं पार पडलं कन्यादान

ऋषी कपूर यांनी धडाक्यात लावलं होतं लेकीचं लग्न, 14 वर्षांपूर्वी असं पार पडलं कन्यादान

ऋषी कपूर यांचं मुलगी रिद्धिमावर खूप प्रेम होतं. मात्र वडिलांच्या निधनानंतर तिला लॉकडाऊनमुळे त्यांचं अंतिम दर्शनही घेता आलं नाही.

  • Share this:

मुंबई, 7 मे : ऋषी कपूर यांनी 30 एप्रिलला जगाचा निरोप घेतला. मात्र चाहत्यांच्या मनात त्यांच्या आठवणी अद्याप ताज्या आहेत. दरम्यान त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. ऋषी कपूर यांचं मुलगी रिद्धमाशी खूप चांगलं बॉन्डिंग होतं आणि 14 वर्षांपूर्वी त्यांनी मोठ्या धामधूमीत आपल्या लाडक्या लेकीचं लग्न लावून दिलं होतं. ज्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

अभिनेता ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या बालपणापासून ते आतापर्यंतचे अनेक आणि कधीही न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते. इतकंच काय तर 40 वर्षांपूर्वीच त्यांच्या लग्नाचं कार्ड सुद्धा व्हायरल झालं होतं. त्यानंतर आता त्यांची मुलगी रिद्धिमाच्या लग्नाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. ज्यात ते आपल्या मुलीचं कन्यादान करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे व्हायरल झालेले हे फोटो 14 वर्षांपूर्वीचे आहेत. आपल्या मुलीच्या लग्नात त्यांनी गोल्डन कलरची शेरवानी घातली होती.

दुसऱ्या एक फोटोमध्ये रिद्धिमा तिचा नवरा भारत साहनी आणि भाऊ रणबीर कपूर यांच्यासोबत दिसत आहे. ज्यात रणबीर सप्तपदीचे विधी पार पाडताना दिसत आहे.

ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांची मोठी मुलगी रिद्धिमा मुलगा रणबीर पेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे. 2006 मध्ये रिद्धिमाचं लग्न बिझनेसमन भारत साहनी यांच्यासोबत दिल्लीमध्ये झालं होतं. या दोघांना एक मुलगी सुद्धा आहे जिचं नाव समारा असून तिचा जन्म 2011 मध्ये झाला होता. सध्या रिद्धिमा तिच्या कुटुंबासोबत दिल्ली येथेच राहते. मात्र वडिलांच्या निधनानंतर ती मुंबईला परतली आहे.

संजय दत्त ते शाहरुख खान... दारूच्या नशेमुळे वादात अडकले होते हे बॉलिवूड स्टार्स

30 एप्रिलला ऋषी कपूर यांचं निधन झालं. त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जेव्हा रिद्धिमाला आपल्या वडिलांच्या बिघडलेल्या तब्येतीविषयी समजलं तेव्हा ती मुंबईला येणार होती. मात्र लॉकडाऊनमुळे तिला हे शक्य झालं नाही. अखेर तिनं वडिलांचं अंतिम दर्शन सुद्धा व्हिडीओ कॉलवरुनच घेतलं.

(संपादन- मेघा जेठे.)

कधीकाळी एकता कपूरशी लग्न करायला तयार झाला होता करण जोहर, पण...

KBC 12 च्या शूटिंग वादावर बिग बी म्हणतात; 'माझ्या कामाचा त्रास असेल तर...'

First published: May 7, 2020, 5:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading