जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / आशुतोषने का उचलले टोकाचे पाऊल? पोलिसांनी सापडली नाही सुसाइड नोट

आशुतोषने का उचलले टोकाचे पाऊल? पोलिसांनी सापडली नाही सुसाइड नोट

आशुतोषने का उचलले टोकाचे पाऊल? पोलिसांनी सापडली नाही सुसाइड नोट

मराठी चित्रपटासृष्टीतील नवोदित कलाकार अभिनेता आशुतोष भाकरेने बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण सिनेसृष्टी हादरली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नांदेड, 30 जुलै : मराठी चित्रपटासृष्टीतील नवोदित कलाकार अभिनेता आशुतोष भाकरेने (Aasgutosh Bhakare) बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण सिनेसृष्टी हादरली आहे. मात्र अद्याप त्याने आत्महत्या का केली, याचे कारण मात्र स्पष्ट झाले नाही आहे. ‘खुलता कळी खुलेना’ फेम मयुरी देशमुख (Mayuri Deshmukh) आणि आशुतोष भाकरेचे 21 जानेवारी 2016 रोजी लग्न झाले होते. तो चार वर्षांपासून मुबंईत राहत होता मात्र आता लॉकडाऊनच्या काळात एका महिन्यापूर्वी आशुतोष नांदेडला आला होता. गणेश नगर याठिकाणी असणाऱ्या घरामध्ये तो राहत होता तर मयुरी मुंबईत होती. गणेशनगर याठिकाणी असणाऱ्या त्याच्या राहत्या घरी त्याने आत्महत्या केली. पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरु केला मात्र अद्याप याबाबतचे कोणतेही कारण स्पष्ट झाले नाही आहे. पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट देखील यानंतर सापडली नसल्याने या प्रकरणातील तिढा आणखी वाढला आहे. त्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. (हे वाचा- कोण आहे श्रुती मोदी? सुशांतच्या मृत्यूप्रकरणी पाटणा पोलीस करणार चौकशी ) दरम्यान महिनाभरापूर्वी आशुतोषने त्याच्या फेसबुक अकाउंटवरून आत्महत्येसंदर्भात भाष्य करणारा व्हिडीओ शेअर केला होता. एका डॉक्टरचा हा व्हिडीओ आहे. जगण्याची उमेद एखाद्यामध्ये जास्त असते, आपण एखाद्या व्यक्तीला मदत केल्यास त्याला आत्महत्या करण्यापासून वाचवू शकतो याबाबत मार्गदर्शन करणारा हा व्हिडीओ आहे. आशुतोषने त्याच्या फेसबुकवर हा व्हिडीओ शेअर केला होता. त्याने हा व्हिडीओ शेअर केल्यामुळे महिनाभर आधीपासून तो कोणत्या विचारात होता याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. (हे वाचा- अंकिता लोखंडेला कुणापासून धोका? अभिनेत्रीला दिलं जाणार पोलीस संरक्षण - सूत्र ) आशुतोष भाकरे याने ने ‘भाकर’, ‘इच्यार ठरला पक्का’ या चित्रपटात काम केलं आहे. 2017 साली मयुरीने ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या निमित्ताने एका प्रसिद्ध वृत्तपत्रात दोघांची लव्हस्टोरी प्रकाशित झाली होती. मयुरी आज  यशाच्या शिखरावर आहे. ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली.  मयुरीने लिहिलेले-दिग्दर्शित केलेले नाटक ‘डिअर आजो’ने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. सध्या तिचे ‘तिसरे बादशहा हम हे’ नाटक सुरु होते. याशिवाय ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’, ‘31 दिवस’ अशा काही चित्रपटात तिनं भूमिका साकारली आहे. अशावेळी आशुतोषने उचललेले टोकाचे पाऊल मनाला चटका लावणारे आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात