नवी दिल्ली, 09 डिसेंबर: कतरिना कैफ (Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding live updates) आणि विकी कौशल यांचं लग्न अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलं आहे. या दोघांच्या रिलेशनशिपबाबत जेव्हापासून सर्व फॅन्सना माहिती झालं, तेव्हापासून सलमान खान (Salman Khan and Katrina Kaif) या दोघांच्या लग्नाला उपस्थित राहणार का? हा प्रश्न सर्वच फॅन्सना पडला आहे. सलमान आणि कतरिना यांच्या मैत्रीबाबत सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे सलमान या लग्नाला उपस्थित राहीलच असं त्यांच्या फॅन्सना वाटत होते. मात्र, आता सलमान या लग्नाला हजर राहणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
कतरिना आणि विकी यांचं लग्न अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. मीडिया अहवालांनुसार, लग्नाला उपस्थित राहणाऱ्या लोकांसाठी अगदी कडक नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे बरेच सेलिब्रिटी या लग्नाकडे (Katrina-Vicky Wedding) पाठ फिरवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातही सलमान नक्कीच या लग्नाला उपस्थित राहील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, सलमानचा एअरपोर्टवरील व्हिडीओ (Salman Khan airport video) समोर आल्यामुळे कतरिनाच्या लग्नादिवशी सलमान भारतातच नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे वाचा-विकी कौशलच्या वडिलांचं शाहरूखसोबत आहे खास कनेक्शन; सलमानसोबत कसं आहे नातं?
मीडिया अहवालातील माहितीनुसार, सलमान आपल्या दबंग टूरसाठी (Salman Khan Dabangg tour) रियाधला रवाना झाला आहे. रियाधला 10 डिसेंबर रोजी त्याचा शो आहे. या शोबाबत सलमानने आधीच इन्स्टाग्रामवर माहिती दिली होती. कतरिना आणि विकी यांचे लग्नही याच दरम्यान असल्याची माहिती मिळाली आहे. म्हणजेच, कतरिनाच्या लग्नादिवशी सलमान भारताबाहेर असणार आहे.
View this post on Instagram
दरम्यान, कतरिना आणि विकी कौशलचा विवाह सोहळा राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये पार पडणार आहे. या दोघांनीही आपल्या लग्नाबाबत अतिशय गुप्तता पाळली आहे. या लग्नाचे फोटो किंवा व्हिडिओ बाहेर लीक होऊ नयेत यासाठी येणाऱ्या पाहुण्यांना मोबाईल बाळगण्यास परवानगी नसणार आहे. यासोबतच पाहुण्यांकडून नॉन डिस्क्लोजर अग्रीमेंटवर सह्या घेतल्या जात आहेत. मीडिया अहवालानुसार, या लग्नाच्या टेलिकास्टचे हक्क बड्या ओटीटी प्लॅटफॉर्मला (Katrina-Vicky wedding rights) विकले गेले आहेत; यामुळेच समारंभातील फोटो लीक न व्हावेत ही खबरदारी घेतली जात असल्याचेही म्हटले जात आहे. माध्यमांमधून मिळालेल्या माहितीनुसार, 7 ते 09 डिसेंबर दरम्यान हिंदू पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Katrina kaif, Salman khan, Vicky kaushal