मुंबई, 26 मे- ‘पंचायत’ (Panchayat) वेब सीरिज OTT वरील सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरिजमधील एक बनली आहे. गावातील छोटे छोटे आनंद आणि गजबज मांडणारी ही वेबसीरीज आहे. ही सीरिज पाहणारे लोक त्याचं प्रचंड कौतुक करत आहेत. ‘पंचायत’ने जितेंद्र कुमार सारख्या उदयोन्मुख कलाकारांना आपलं अभिनय कौशल्य दाखवण्याची संधी दिली आहे. तर चंदन रॉयसारख्या (Chandan Roy) अभिनेत्यांना वेगळी ओळख मिळवून दिली आहे. सध्या ‘पंचायत’चा दुसरा सीजन धुमाकूळ घालत आहे. अशातच या सीरिजमधील कलाकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सध्या डिजिटल प्लॅटफॉर्मला जास्त पसंती मिळत आहे. या प्लॅटफॉर्मवर सध्या अनेक वेबसीरिजची चलती आहे. वेबसीरिजचा एक विशेष प्रेक्षकवर्ग निर्माण झाला आहे. सध्या ‘पंचायत’ या वेबसीरिजचा दुसरा भाग लोकप्रियता मिळवत आहे. ‘पंचायत’ वेब सीरिजमधील चंदन रॉयच्या अभिनयाला चांगलीच पसंती मिळत आहे. इंडिया टुडेशी संवाद साधताना चंदन म्हणाला, “मी थिएटरच्या पार्श्वभूमीतून आलो आहे. जेव्हा मला विकासची भूमिका मिळाली तेव्हा मी विचार केला होता की मी अभिनय करणार नाही.मी फक्त विकास बनणार आहे आणि त्यामुळेच मला ते खूप नैसर्गिक वाटले. या सीरिजमध्ये विकास अभिषेकला ‘अविषेक’ आणि रस्त्याला हिंदीत सडक म्हणण्याऐवजी ‘सरक’ म्हणताना दिसून येतो. यामागचे कारण सांगताना चंदन म्हणतो, “मी बिहारमध्ये राहायचो तेव्हा असंच काहीसं बोलत असे . पण जेव्हा मी मुंबईत आलो तेव्हा या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करण्यात बराच वेळ गेला. माझा उच्चार बरोबर झाल्यानंतर मला ‘पंचायत’ मिळाली आणि मला पुन्हा बिहारमधल्या माझ्या गावी जाऊन माझी भाषा आधी होती तशीच करावी लागली. **(हे वाचा:** मिस वर्ल्ड बनण्यापूर्वी ऐश्वर्या रायने केलं होतं असं फोटोशूट, मिळाले होते फक्त इतके पैसे ) आपल्या करिअरबाबत सांगताना चंदन म्हणतो, “मी दोन वर्षे दिल्लीत पत्रकार म्हणून काम केलं आहे. तिथून नाट्यगृहात अभिनय करायला सुरु केलं. 2017 मध्ये मी मुंबईत आलो तेव्हा मला करिअर करण्यासाठी खूप काही सहन करावं लागलं. मला अपमान सहन करावा लागला आणि आपल्या या अवस्थेवर मी प्रचंड रडलो. आपल्या संघर्षाच्या दिवसांचा एक किस्सा सांगताना चंदन म्हणतो-“मला मुंबईत येऊन फक्त 10 दिवस झाले होते आणि मला एका रिअॅलिटी शोमधून फोन आला आणि मला 2,500 रुपये मिळतील असे सांगितले. हे ऐकून मी आनंदी झालो आणि त्या पैशातून मी स्वतःसाठी एक गादी आणि शूज विकत घेईन असा विचार केला. पण जेव्हा मानधन घेण्याची वेळ आली तेव्हा माझ्या हातात फक्त 215 रुपये दिले. मी विचारलं 2500 रुपये ठरविण्यात आले होते. तेव्हा त्यांनी सांगितले की, 250 सांगण्यात आले होते. त्यावेळी मी खूप रडलो आणि विचार केला की मी कुठे येऊन पोहोचलोय. **(हे वाचा:** बॉलिवूडच्या ‘या’ 5 चित्रपटांना अजय देवगणने दिला होता नकार, रिलीज होताच ठरले ब्लॉकबस्टर ) चंदन म्हणतो, “आता माझा संघर्ष संपला आहे. आता मी कामाच्या बाबतीत खूप निवडक झालो आहे आणि तोलूनमोलून मानधन घेतो. हे सर्व बदल ‘पंचायत’ नंतर आले आहेत. नाहीतर याआधी मी पडद्यावर एक मृतदेह होणंदेखील मान्य करायचो. हजार रुपये घेऊनही काम करायचो. जर मला जास्त भूक लागली तर मी 10 रुपयांना 3 केळी विकत घ्यायचो, पण आता मी माझ्यासाठी चांगल्या ठिकाणी घर घेण्याचा विचार करत आहे. जेणेकरुन जे श्रीमंत लोक मला भेटायला येतात, ते माझ्या राहत्या घरावरुन माझी पारख करु नयेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







