जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / मिस वर्ल्ड बनण्यापूर्वी ऐश्वर्या रायने केलं होतं असं फोटोशूट, मिळाले होते फक्त इतके पैसे

मिस वर्ल्ड बनण्यापूर्वी ऐश्वर्या रायने केलं होतं असं फोटोशूट, मिळाले होते फक्त इतके पैसे

मिस वर्ल्ड बनण्यापूर्वी ऐश्वर्या रायने केलं होतं असं फोटोशूट, मिळाले होते फक्त इतके पैसे

माजी मिस वर्ल्ड (Miss World), अभिनेत्री आणि बच्चन कुटुंबाची सून असलेली ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) आयुष्यातील प्रत्येक भूमिका सुंदरपणे साकारण्यासाठी ओळखली जाते. तिनं आपलं करिअर आणि घरातील जबाबदाऱ्या यामध्ये योग्य तो समतोल साधला आहे.

     मुंबई, 25 मे-   माजी मिस वर्ल्ड (Miss World), अभिनेत्री आणि बच्चन कुटुंबाची सून असलेली ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) आयुष्यातील प्रत्येक भूमिका सुंदरपणे साकारण्यासाठी ओळखली जाते. तिनं आपलं करिअर आणि घरातील जबाबदाऱ्या यामध्ये योग्य तो समतोल साधला आहे. जेव्हापासून ऐश्वर्यानं मिस वर्ल्डसारख्या आंतरराष्ट्रीय स्टेजवर आपल्या सौंदर्याची जादू दाखवली होती तेव्हापासून ती सतत मीडियाच्या (Media) आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिली आहे. मीडियावाले या सुंदर अभिनेत्रीची प्रत्येक पोज कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी उत्सुक असतात. सध्या ऐश्वर्या मुलगी आराध्याच्या (Aaradhya) पालनपोषणावर लक्ष केंद्रित करत आहे. अलीकडेच तिनं कान फिल्म फेस्टिव्हलमध्येही (Cannes Film Festival) उपस्थिती लावली होती. तिथे ऐश्वर्याच्या लूकची बरीच चर्चा झाली. ऐश्वर्याने आतापर्यंत चित्रपटांमध्ये एकापेक्षा एक अविस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. यासोबतच फॅशन (Fashion) आणि मॉडेलिंगच्या (Modelling) जगातही ऐश्वर्या एक मोठे नाव आहे. तिचा प्रत्येक लूक (Look) आणि प्रत्येक फोटो सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत असतो. आताही ऐश्वर्याचे काही जुने फोटो आणि मॉडेलिंगची फी (Modelling Fees) सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या फोटोंमध्ये तिला ओळखणंही कठीण होत आहे. झी न्यूजनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. विमल उपाध्याय नावाच्या ट्विटर युजरनं कॅटलॉग फोटो आणि मॅगझिन कव्हर फोटोंसह मॅगझिन शूटमधील काही फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. ‘हॅलो, मी प्रकाशित केलेल्या फॅशन कॅटलॉगचा (Fashion Catalog) आज 30वा वर्धापन दिन साजरा करत आहे. ऐश्वर्या राय, सोनाली बेंद्रे (Sonali Bendre), निक्की अनेजा, तेजस्विनी कोल्हापुरे (Tejaswini Kolhapure) या कॅटलॉगमधील (एसआयसी) मॉडेलपैकी होत्या,’ असं हे ट्विट आहे. या फोटोंपैकी ऐश्वर्या राय आणि सोनाली बेंद्रेचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. 30 वर्षांपूर्वीच्या या फोटोंमध्ये ऐश्वर्या फारच वेगळी दिसत आहे. तिच्या चाहत्यांना तिला लवकर ओळखताही आलं नाही.

    जाहिरात

    ऐश्वर्यानं 1994 मध्ये मिस वर्ल्ड होण्यापूर्वी मॉडेलिंगपासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यावेळच्या बिलाची एक प्रत इंटरनेटवर व्हायरल आली आहे. या बिलावर 23 मे 1992 अशी तारीख आहे. एका मॅगझिन शूटच्या बदल्यात तिला एक हजार 500 रुपये मिळाल्याचं या बिलातून दिसत आहे. ऐश्वर्या त्यावेळी साधारण 18 वर्षांची होती. तिनं कृपा क्रिएशन्स नावाच्या एका मॅगझिन कॅटलॉग शूटसाठी मॉडेल म्हणून काम करण्यास सहमती दर्शवली आहे, असंही या बिलात दिसत आहे. बिलाच्या शेवटी तिची सही आहे. हे कॉन्ट्रॅक्ट मुंबईमध्ये साईन करण्यात आलं होतं.ऐश्वर्या राय सध्या कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. मात्र, तिनंदेखील कधीकाळी अतिशय कमी मानधनावर काम केलं होतं, हे

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात