आज आपण अशा 5 बॉलिवूड सुपरहिट चित्रपटांबद्दल बोलणार आहोत ज्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर थक्क करणारी कामगिरीही केली. महत्वाची बाब म्हणजे हे बिग बजेट चित्रपट आधी अजय देवगणला ऑफर करण्यात आले होते. पण त्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने ते नाकारले. जवळपास दोन दशकांच्या कारकिर्दीत अजय देवगणने असे चित्रपट नाकारले आहेत, ज्यांचा आतापर्यंत सुपर-डुपर हिट चित्रपटांमध्ये समावेश झाला आहे. जाणून घ्या अजय देवगणने कोणत्या मोठ्या चित्रपटां नकार दिला होता.
अजय देवगणने जवळपास त्याच्या प्रत्येक चित्रपटात स्वतःला सिद्ध केलं आहे. 'प्यार तो होना ही था', 'सिंघम', 'गोलमाल फ्रेंचाइजी', 'तान्हाजी', 'रेड', 'गंगाजल' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने उत्कृष्ट अभिनय केला आहे. पण यादरम्यान, त्याने असे अनेक मोठे चित्रपट करण्यास नकारसुद्धा दिला आहे.जे नंतर सुपडूपर हिट ठरले आहेत.
कुछ कुछ होता है: अजय देवगण आणि काजोल यांनी 'प्यार तो होना ही था', 'इश्क' आणि 'राजू चाचा' सारख्या काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. मात्र, 1998 मध्ये अजय देवगणला काजोलसोबत काम करण्याची चांगली संधी मिळाली होती. 'कुछ कुछ होता है'मधील शाहरुखची भूमिका सुरुवातीला अजय देवगणला ऑफर करण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव तो या प्रोजेक्टमधून बाहेर पडला होता. 'कुछ कुछ होता है' हा 90 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे आणि अजूनही प्रेक्षक मोठ्या आवडीने हा चित्रपट पाहतात.
डर: शाहरुखच्या अभिनयामुळे आणि अनोख्या डायलॉगसमुळे हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांच्या मनात जसाच्या तसा आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, दिग्दर्शक यश चोप्रा यांनी या चित्रपटासाठी अजय देवगणला व्हिलन म्हणून घेण्याचा विचार आधी केला होता. पण अजयने नकार दिला होता. काही मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, अजय उटीमध्ये त्याच्या एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होता आणि त्याने कधीही निर्मात्यांना उत्तर कळवलं नाही. अशाप्रकारे हा चित्रपट अखेर शाहरुख खानच्या हाती लागला.
करण-अर्जुन: 'करण अर्जुन' हा शाहरुख खान आणि सलमान खानच्या करिअरचा ब्लॉकबस्टर चित्रपट होता. या चित्रपटासाठी दिग्दर्शक राकेश रोशन यांच्या सुरुवातीच्या निवडींपैकी अजय देवगण हा एक होता. थ्रोबॅक रिपोर्ट्सनुसार, अजयला अर्जुनची भूमिका साकारायची होती. तरीही करण (सलमान खान) ची भूमिका साकारण्यासाठी अजयला सहभागी करण्यात आले. यानंतर, राकेश रोशन यांच्याशी काही रचनात्मक मतभेदांमुळे त्याने या चित्रपटाला नकार दिला.
बाजीराव मस्तानी : संजय लीला भन्साळी यांच्या 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटासाठी रणवीर सिंहने प्रचंड मेहनत घेतली होती. एका रिपोर्टनुसार, अजय देवगणला ही भूमिका ऑफर करण्यात आली होती, परंतु डेट्समुळे त्याने नकार दिला. त्यांनतर रणवीर सिंहने भूमिका साकारली आणि या चित्रपटाने त्याला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, आयफा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, प्रोड्यूसर्स गिल्ड फिल्म पुरस्कार, स्क्रीन अवॉर्ड आणि बरेच पुरस्कार जिंकून दिले आहेत.
पद्मावत- संजय लीला भन्साळी यांचा आणखी एक ब्लॉकबस्टर चित्रपट म्हणजे 'पद्मावत' होय. यामध्ये दीपिका पादुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंह यांनी महत्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील अलाउद्दीन खिल्जी ही रणवीरची भूमिका सुरुवातीला अजय देवगणला ऑफर करण्यात आली होती. परंतु काही कारणास्तव त्याने नकार दिला.