Home /News /national /

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना AIIMSमध्ये केलं दाखल, दुसऱ्य़ांदा कोरोना रिपोर्ट आले निगेटिव्ह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना AIIMSमध्ये केलं दाखल, दुसऱ्य़ांदा कोरोना रिपोर्ट आले निगेटिव्ह

गेल्या काही दिवसांपासून अमित शाह होम आयसोलेशनमध्ये होते.

    नवी दिल्ली, 18 ऑगस्ट : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना AIIMSमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अमित शाह यांना गेल्या दोन-तीन दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते. त्यांमुळे त्यांना रात्री 2 वाजता ओल्ड प्रायव्हेट वार्डमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अमित शाह यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असून त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना ठेवण्यात आले आहे. याआधी अमित शाह यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. उपचारानंतर दुसऱ्यांदा चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून अमित शाह होम आयसोलेशनमध्ये होते. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या संदर्भात एम्स रुग्णालयानं एक निवेदन जारी केलं आहे. अमित शहा यांनी गेल्या आठवड्यात 14 ऑगस्ट रोजी कोरोनामुक्त झाल्याचे स्वतः ट्वीट करून सांगितले होते. शाह यांनी ट्वीट करून आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती. याआधी अमित शाह यांनी 14 ऑगस्ट रोजी, "माझी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मी देवाचे आभार मानतो आणि ज्या लोकांना माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना केली, माझ्या कुटुंबियांना आधार दिला त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो". मात्र आता पुन्हा त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. संपादन- प्रियांका गावडे
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Amit Shah, Coronavirus

    पुढील बातम्या