सलमानबरोबर 17 वर्षांपूर्वी झालेल्या भांडणावर विवेक ओबेरॉय म्हणतो, मला कोणावरही...

सलमानबरोबर 17 वर्षांपूर्वी झालेल्या भांडणावर विवेक ओबेरॉय म्हणतो, मला कोणावरही...

ऐश्वर्या रायमुळे या विवेक आणि सलमान यांच्यात वैर आलं आणि अद्याप या दोघांचे संबंध सुधारलेले नाहीत.

  • Share this:

मुंबई, 23 मे : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्यातलं नातं कसं आहे. हे सर्वांनाच माहित आहे. सलमान खान म्हणजे मित्रांचा पक्का मित्र आण शत्रूचा कट्टर शत्रू हे सर्वांनाच माहित आहे. एकदा सलमानशी दुश्मनी केली की मग त्याच्या गुड बुकमध्ये येणं कोणालाच शक्य नाही. ऐश्वर्या रायमुळे या विवेक आणि सलमान यांच्यात वैर आलं ते अद्याप या दोघांचे संबंध सुधारलेले नाहीत. 2003 मध्ये विवेकनं सलमानवर गंभीर आरोप केले होते. सलमाननं आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचं त्यानं म्हटलं होतं. पण त्यानंतर या दोन्ही अभिनेत्यांनी एकमेकांबद्दल कोणतीही कमेंट करणं नेहमी टाळलं. पण हल्लीच विवेकनं सलमानसोबतच्या त्या भांडणावर मौन सोडलं.

सलमान खान बॉलिवूडचा सर्वांत मोठा स्टार मानला जातो. अनेकदा त्याच्यावर विवेक ओबेरॉचं करिअर खराब केल्याचा आरोप केला जातो. विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या यांच्यातली जवळीक आणि विवेकनं सलमानच्या विरोधात घेतलेली प्रेस कॉन्फरन्स यामुळे सलमान आणि विवेक यांच्यातील नात्यातला तणाव वाढला. अर्थात त्यानंतर विवेक आणि ऐश्वर्यातलं नातं पण संपुष्टात आलं. पण त्यानंतर 17 वर्षांनंतर विवेक नुकत्याच एका मुलाखतीत यावर पहिल्यांदाच व्यक्त झाला.

लॉकडाऊनमध्ये रणबीरनंच केला होता आलियाचा हेअरकट, असा झाला खुलासा

 

View this post on Instagram

 

In hazy crazy Dilli!

A post shared by Vivek Oberoi (@vivekoberoi) on

नवभारत टाइम्सशी बोलताना विवेक म्हणाला, ही खूप जुनी गोष्ट आहे. मी आता माझ्या वैयक्तीत आयुष्या अशा ठिकाणी पोहोचलो आहे. ज्या ठिकाणी या सर्व गोष्टी मला खूप लहान वाटतात. या निगेटिव्ह गोष्टींवर आपण जर बोलत राहिलो तर त्यातून आपल्याला काहीच मिळणार नाही. आपल्याला आता सकारात्मक गोष्टींवर बोलायला हवं. जे घडलं ते विसरून पुढे जायला हवं. मला कोणावर नाराजी किंवा राग नाही.

एप्रिल 2003 ला विवेकनं सलमान खानच्या विरोधात एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. यावेळी विवेकनं सांगितलं की 29 मार्च 2003 च्या रात्री 12.30 पासून ते सकाळी 5 वाजेपर्यंत सलमाननं त्या 41 वेळा कॉल केले होते आणि शिव्या घालत त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. पण काही वर्षांपूर्वी विवेकनं सलमानच्या विरोधात प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपण चूक केल्याचंही कबुल केलं होतं.

जगात वेगाने पसरतोय आणखी एक व्हायरस, विद्या बालननं सांगितलं कसं वाढतं संक्रमण

VIDEO: चुकीच्या पद्धतीनं सिगार ओढणं पडलं महागात, अशी झाली उर्वशी रौतेलाची अवस्था

First published: May 23, 2020, 4:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading