जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / जगात वेगाने पसरतोय आणखी एक व्हायरस, विद्या बालननं सांगितलं कसं वाढतं संक्रमण

जगात वेगाने पसरतोय आणखी एक व्हायरस, विद्या बालननं सांगितलं कसं वाढतं संक्रमण

जगात वेगाने पसरतोय आणखी एक व्हायरस, विद्या बालननं सांगितलं कसं वाढतं संक्रमण

अभिनेत्री विद्या बालननं नुकतीच जगभरात पसरत असलेल्या एका नव्या व्हायरसची माहिती दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 23 मे : सध्या जगभरात सध्या कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस या व्हायरसचं संक्रमण वाढत चाललं आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी या व्हायरसच्या लढाईत आपापलं योगदान देत आहेत. कोरोना व्हायरस संबंधी शक्य तेवढी जागरुकता पसरण्याचं काम करत आहेत. पण अशात अभिनेत्री विद्या बालननं नुकतीच जगभरात पसरत असलेल्या एका नव्या व्हायरसची माहिती दिली आहे. या संबंधीत एक व्हिडीओ विद्यानं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्या आधी अभिनेता मानव कौलनं सुद्धा यासंबंधी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. विद्या बालननं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओमध्येही मानव कौल सुद्धा दिसत आहे. या व्हिडीओमध्ये विद्या बालन सांगते, जगात कोरोना व्हायरस व्यतिरिक्त आणखी एक व्हायरस वेगानं पसरत आहे. मानव कौलनं या व्हायरसचं नाव अफवा व्हायरस असं सांगितलं आहे. तो सांगतो, मेडिकल रिपोर्टनुसार हा अफवा व्हायरस फोनचं फॉरवर्ड बटण दाबल्यानं पसरतो. या व्हायरसची लक्षणं तर अनेक आहेत पण जास्तीत जास्त केसेसमध्ये UNESCO, SCRIPTURES, NASA, NUMEROLOGY हे शब्द वापरलेले दिसून येतात. लेक पडतेय आईवर भारी! लॉकडाऊनमध्ये श्वेता तिवारीच्या मुलीचा BOLD सेल्फी व्हायरल

जाहिरात

विद्या बालन सांगते, मी तर ऐकलं आहे की सोशल मीडिया हा अफवा व्हायरसचा रेड झोन आहे. मानव कौलनं या व्हिडीओमध्ये अपील केलं आहे की, त्यामुळे सोशल मीडियावर कोणतीही माहिती मिळाल्यास ती WHO आणि मिनिस्ट्री ऑफ हेल्थ कडून मिळालेल्या माहितीशी तपासून घ्या. कोरोना व्हायरस तर परसत आहेच पण त्यात हा अफवा व्हायरस आणखी पसरू देऊ नका. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये विद्या बालननं लिहिलं, एक नवा व्हायरस सध्या संपूर्ण जगभरात पसरत आहे. पण त्यामुळे आणखी नुकसान होण्याआधी आपण त्याला रोखलं पाहिजे. विद्या बालन आणि मानव कौल यांनी या व्हिडीओतून सोशल मीडिवरून पसरणाऱ्या वेगवेगळ्या अफवाबाबत जागरुकता पसरवण्याचा काम केलं आहे. ‘मस्तराम सीझन 2’ची तयारी सुरू, पण अभिनेत्याला इंटिमेट सीन्सच्या शूटिंगची चिंता लॉकडाऊनमध्ये मालिकेतील सुसंस्कृत सूनेच्या BOLD PHOTOSची तुफान चर्चा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात