चुकीच्या पद्धतीनं सिगार ओढणं पडलं महागात, अशी झाली उर्वशी रौतेलाची अवस्था, पाहा VIDEO

चुकीच्या पद्धतीनं सिगार ओढणं पडलं महागात, अशी झाली उर्वशी रौतेलाची अवस्था, पाहा VIDEO

सोशल मीडियावर उर्वशी रौतेलानं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती सिगार ओढताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 23 मे : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या सिनेमांपेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळे खूप चर्चेत असते. सध्या लॉकडाऊनच्या काळात उर्वशी सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. ती अनेकदा तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. याशिवाय सध्या तिचे काही थ्रोबॅक व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. आताही तिचा असाच एक सिगार ओढतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात चुकीच्या पद्धतीनं सिगार ओढल्यानं उर्वशीची फारच वाईट अवस्था झाल्याचं पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर उर्वशी रौतेलानं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती सिगार ओढताना दिसत आहे. अर्थात हा तिच्या एक सिनेमाच्या शूटिंगचा भाग होता. सिनेमाची गरज म्हणून उर्वशीनं सिगार ओढला खरा पण तो नेमका कसा ओढायची याची तिला काहीच कल्पना नसल्यानं जळता सिगार तिच्या अंगावर पडला. याशिवाय नाकातोंडात धूर गेल्यानं तिची फारच वाईट अवस्था झाल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

'मस्तराम सीझन 2'ची तयारी सुरू, पण अभिनेत्याला इंटिमेट सीन्सच्या शूटिंगची चिंता

उर्वशी रौतेलानं स्वतःच हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे ज्याच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, 'बिहाइंड द सीन्स, मी शूट करत होते मात्र मला माहित नव्हतं ती की सिगार कसा ओढला जातो.' या कॅप्शनसोबतच तिनं धुम्रपान तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे अशी सुचना सुद्धा दिली आहे. तसेच नो स्मोक फॉर लाइफ असा हॅशटॅग सुद्धा तिनं या पोस्टमध्ये वापरला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला असून त्यावर चाहत्यांच्या वेगवेगळ्या कमेंट पाहायला मिळत आहेत.

लॉकडाऊनमध्ये मालिकेतील सुसंस्कृत सूनेच्या BOLD PHOTOSची तुफान चर्चा

उर्वशीच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर लॉकडाऊनच्या आधी तिचं 'एक डायमंड दा हार लेदे यार' हे गाणं रिलीज झालं होतं. तिच्या या गाण्याची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती. याशिवाय त्याआधी ती 'पागलपंती' या सिनेमात दिसली होती. काही दिवसांपूर्वी तिचा बेली डान्सचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

मनोरंजन उद्योग तात्पुरता ग्रीन झोनमध्ये हलवता येईल का? मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2020 11:08 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading