...म्हणून सलमाननं विवेकला केले होते तब्बल 41 कॉल, विवेकच्या 'या' कृतीमुळे भडकली होती ऐश्वर्या

...म्हणून सलमाननं विवेकला केले होते तब्बल 41 कॉल, विवेकच्या 'या' कृतीमुळे भडकली होती ऐश्वर्या

ऐश्वर्याला सांभाळायच्या नादात त्या दिवशी विवेकनं जे काही केलं ज्यानं त्याचं संपूर्ण आयुष्य बदललं.

  • Share this:

मुंबई, 21 मे :  बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय सध्या सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यावरील एक मीम ट्वीट केल्यामुळे चर्चेत आहे. या ट्वीटवरून त्याच्यावर सर्वांनीच टीका केली आहे. त्यानंतर विवेकनं ऐश्वर्याची जाहीर माफी मागून हे प्रकरण मिटवलं असलं तरीही आता सलमान-ऐश्वर्याच्या चाहत्यांमध्ये मात्र काही वर्षांपूर्वी झालेल्या सलमान आणि विवेकमधील वादाची चर्चा मात्र सुरू झाली आहे. खरं तर सत्य सांगायला आणि ते स्वीकारायला खूप हिंमत लागते. ही हिंमत काही वर्षांपूर्वी विवेकनं दाखवली मात्र यामुळे त्याचं करिअर मात्र कायम स्वरूपी धोक्यात आलं. सलमान आणि ऐश्वर्यामधील भांडण प्रेस कॉन्फरन्समार्फत सर्वांसोमार मांडणं विवेकला खूप महागात पडलं.

सलमान आणि ऐश्वर्याच्या नात्यामध्ये त्यावेळी दुरावा आला होता. सलमानला हे समजलं होतं की, ऐश्वर्यासोबतच त्याचं नातं आता जवळजवळ संपलं आहे. पण तरीही तो या नात्याला पुन्हा एक संधी देण्याचा प्रयत्न करत होता. पण अशातच या दोघांच्या मध्ये विवेक ओबेरॉयची एंट्री झाली. सलमानशी झालेल्या ब्रेकअपमुळे आधीच तुटलेल्या ऐश्वर्याचा विवेक आधार बनला. पण तिला सांभाळायच्या नादात त्या दिवशी त्यानं जे काही केलं ज्यानं त्याचं संपूर्ण आयुष्य बदललं.

अखेर ऐश्वर्यासमोर पुन्हा एकदा नमला विवेक ओबेरॉय, अशी मागितली जाहीर माफीLoading...


 

View this post on Instagram
 

LOVE YOU ANGEL AARADHYAHappiest Birthday my darling


A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

विवेक आणि ऐश्वर्याच्या अफेअर्सच्या चर्चा सलमानच्या कानावर गेल्या होत्या त्यामुळे रागात त्यानं विवेकला फोन केला. पण त्याला माहीत नव्हतं की विवेकनं त्यावेळी प्रेस कॉन्फरन्स बोलवली होती. याचाच फायदा विवेकनं उचलला आणि अचानक त्यानं मीडियासमोर तो काही सांगू इच्छित असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर त्यानं सलमान-ऐश्वर्याच्या भांडणाबाबत सर्व काही मीडियासमोर उघड केलं. विवेक म्हणाला, 'सलमाननं मला 41 वेळा फोन केला आणि धमकी दिली. हे पहा मिस्ड कॉल आणि त्यानं सर्वांसमोर जीवे मारण्याची धमकी दिली आहे.'

‘ती अजूनही माझ्या कवेत आहेत,’ विवेकच्या या वक्तव्यानंतर सलमानने दिली होती ‘ही’ धमकी

या सर्व गोष्टीत ऐश्वर्या आपल्याला पाठींबा देईल असा विवेकचा समज झाला मात्र प्रत्यक्षात असं काहीही झालं नाही.  या प्रेस कॉन्फरन्समध्ये विवेकनं सलमानच्या विरोधात अनेक गोष्ट सांगितल्या. त्यानं सलमानला म्हातारा आणि रागीट एवढंच म्हटलं नाही तर सलमान एक असा अभिनेता आहे ज्याच्याकडे आता काहीही काम नाही असंही सांगितलं. पण विवेकच्या या सर्व गोष्टींनी मात्र सलमानची झोप उडवली. पण त्यावेळी तो गप्प राहिला.

…म्हणून पहाटे 3 वाजेपर्यंत सलमान ऐश्वर्या रायचा दरवाजा वाजवत होता


विवेकच्या अशा प्रकारच्या वागण्यानं मात्र ऐश्वर्या विवेकवर भडकली आणि तिनं त्याला त्याच्या हा कृतीवर खूप सुनावलं. ऐश्वर्याचं असा पवित्रा पाहिल्यावर विवेक घाबरला. त्याला सुरुवातीला या प्रकरणात ऐश्वर्या त्याला पाठींबा देईल असं वाटलं होतं मात्र झालं सर्व उलट आणि या सर्वाचा परिणाम विवेकच्या करिअरवर झाला. पण त्याच्या करिअरला खरा ब्रेक तेव्हा लागला जेव्हा तो सलमानबाबत जे मनाला येईल ते बोलत होता आणि यावेळीच कोणीतरी या सर्व गोष्टी कॉल करून सलमानला ऐकवल्या. त्यानंतर जे झालं ते सर्वांना माहीतच आहे. यशाच्या शिखरावर असलेल्या विवेकचं करिअर या संपूर्ण प्रकरणानंतर कायमचं संपुष्टात आलं. यासोबतच ऐश्वर्यासोबतचं त्याचं नातंही संपलं.

'तिचा सिनेमा पाहायला तर साधा कुत्राही गेला नाही,' ब्रेकअपनंतर सलमानने काढला तिच्यावर राग

VIDEO : विवेकवर भडकले अनुपम खेर, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 21, 2019 06:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...