‘ती अजूनही माझ्या कवेत आहेत,’ विवेकच्या या वक्तव्यानंतर सलमानने दिली होती ‘ही’ धमकी

‘ती अजूनही माझ्या कवेत आहेत,’ विवेकच्या या वक्तव्यानंतर सलमानने दिली होती ‘ही’ धमकी

ऐश्वर्या रायसाठीचं सलमान खान आणि विवेक ओबेरॉयचं भांडणं साऱ्यांनाच माहीत आहे. प्रेमाच्या या त्रिकोणाने जेवढा वाद पाहिला तेवढा वाद आतापर्यंत कोणत्याच कपलने पाहिला नसेल.

  • Share this:

मुंबई, 13 मे- ऐश्वर्या रायसाठीचं सलमान खान आणि विवेक ओबेरॉयचं भांडणं साऱ्यांनाच माहीत आहे. प्रेमाच्या या त्रिकोणाने जेवढा वाद पाहिला तेवढा वाद आतापर्यंत कोणत्याच कपलने पाहिला नसेल. सलमानशी ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्याची विवेकशी मैत्री वाढू लागली. विवेक आणि ऐश्वर्या अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र फिरताना दिसू लागले. यातच एकदा टीव्हीवर विवेकने ऐश्वर्यावर असलेल्या प्रेमाचा स्वीकार करत ती त्याच्या कवेत असल्याचं म्हटलं होतं. त्याचं हे वक्तव्य ऐकून सलमानने त्याला धमकीही दिली होती.

सनी लिओनीने 'या' एका अटीवर साइन केलेले सहा पॉर्न सिनेमे

त्याचे झाले असे की, करण जोहरच्या कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये विवेक गेला होता. या दरम्यान, ऐश्वर्या राय हॉलिवूडमध्ये की बॉलिवूडमध्ये असा प्रश्न विचारला होता. याचं उत्तर देताना विवेक म्हणाला की, ‘ऐश्वर्या माझ्या कवेत...’ त्यावेळी ऐश्वर्या आमि विवेक एकमेकांना डेट करत होते. पण काही महिन्यांनी दोन्ही स्टार एकमेकांपासून वेगळे झाले. यानंतर एका पत्रकार परिषदेत विवेकने त्याला सलमानकडून धमकी मिळाल्याचा उल्लेख केला होता.

पायांवरच्या केसांमुळे शाळेत ट्रोल व्हायची सनी लिओनी

२००३ मध्ये एका मुलाखतीत विवेक म्हणाला की, ‘सलमानने नशेत असताना त्याला फोन केला होता आणि जीवे मारण्याची धमकीही दिली होती.’ यानंतर सलमान विवेकला उध्वस्त करण्याबद्दलही बोलला होता. या सर्व प्रकरणानंतर विवेकने एका पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर सलमानची माफी मागितली होती. पण आजही जवळपास १६ वर्षांनंतरही सलमान आणि विवेक एकमेकांसमोर यायचं टाळतात.

…म्हणून पहाटे 3 वाजेपर्यंत सलमान ऐश्वर्या रायचा दरवाजा वाजवत होता

VIDEO: केरळमध्ये पौर्णिमेची धमाल, हत्तीच्या सोंडेनं उघडलं दक्षिणेचं दार

First published: May 13, 2019, 11:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading