'तिचा सिनेमा पाहायला तर साधा कुत्राही गेला नाही,' ब्रेकअपनंतर सलमानने काढला तिच्यावर राग

आतापर्यंत सलमानचं प्रत्येक नातं चर्चेत आलं. पण ऐश्वर्यासोबतच्या ब्रेकअपची जेवढी चर्चा झाली तेवढी कोणाच्याच ब्रेकअपची झाली नसेल.

News18 Lokmat | Updated On: May 11, 2019 01:27 PM IST

'तिचा सिनेमा पाहायला तर साधा कुत्राही गेला नाही,' ब्रेकअपनंतर सलमानने काढला तिच्यावर राग

मुंबई, 11 मे- जेव्हाही बॉलिवूडमध्ये ब्रेकअपच्या चर्चा होतात त्यात सलमान खानचं नाव नेहमीच अग्रणी असतं. आतापर्यंत सलमानचं प्रत्येक नातं चर्चेत आलं. पण ऐश्वर्यासोबतच्या ब्रेकअपची जेवढी चर्चा झाली तेवढी कोणाच्याच ब्रेकअपची झाली नसेल. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणप्रमाणे या दोघांचं अफेअरही संजय लीला भन्साळी यांच्या सेटवर सुरू झालं. ‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमातून दोघं पहिल्यांदा एकत्र काम करत होती. चित्रीकरणादरम्यानच त्यांच्यात प्रेम खुलत गेलं. सलमानच्या घरच्यांसोबत आणि बहिणींसोबतही ऐश्वर्याचं बॉण्डिंग चांगलं होत चाललं होतं. पण ऐश्वर्याच्या घरच्यांना हे नातं मान्य नव्हतं. अखेर हे नातं तुटलं गेलं.

…म्हणून पहाटे 3 वाजेपर्यंत सलमान ऐश्वर्या रायचा दरवाजा वाजवत होता

नातं संपल्यानंतरही दोघांनी एकमेकांवर दोषारोप करण्याची एकही संधी सोडली नाही. एकीकडे ऐश्वर्याने सलमानवर मारहाण करण्याचा आरोप केला होता तर  दुसरीकडे सलमानने या सर्व गोष्टींना नकार दिला होता.

एकवेळ अशी होती की, संजय लीला भन्साळी यांनी ऐश्वर्या रायला त्यांच्या गुजारिश सिनेमासाठी कास्ट केलं होतं. या सिनेमात तिच्यासोबत हृतिक रोशनची मुख्य भूमिका होती. ऐश्वर्याला सिनेमात घेतल्यामुळे सलमान संजयवर फार नाराज झाला होता आणि त्याने सिनेमाविरुद्ध अनेक गोष्टी बोलल्या होत्या.

आपल्या सावत्र आईपेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे 'ही' अभिनेत्री

Loading...

सलमानने एका कार्यक्रमादरम्यान संजय लीला भन्साळी, हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय यांच्या गुजारिश सिनेमाबद्दल आपलं मत दिलं. सलमान म्हणाला की, ‘गुजारिश सिनेमा पाहायला तर कुत्राही गेला नाही.’ एवढंच बोलून तो थांबला नाही तर दबंग खान पुढे म्हणाला की, ‘त्यात तर माशी उडताना दाखवली आहे, पण वास्तवात एका मच्छरनेही तो सिनेमा पाहिला नाही.’

VIDEO- ‘अरे, किमान दरवाजा तरी बंद करत जा...’, शाहिद कपूरला नेटकऱ्यांनी दिला सल्ला

तर अजून एका कार्यक्रमात लहान मुलीने सिनेसृष्टीत मोठं कसं व्हायचं असा प्रश्न सलमानला विचारला. यावर संजय लीला भन्साळी यांना उद्देशून सलमानने उत्तर देत म्हटलं की, ‘त्यांना जाऊन भेट.. तो तुझ्यावर सिनेमा करेल.. स्वतः खूप कमाई करेल, पण तुम्हाला काही देणार नाही.’

‘गुजारीश’ सिनेमाच्या प्रदर्शनावेळी ऐश्वर्याने सलमानच्या या उत्तरावर प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. पण हृतिकने मात्र यावर प्रतिक्रिया देत म्हटलं की, ‘कोणाचा सिनेमा चालला नाही तर त्यावर हसणं नक्कीच योग्य नाही. ही काही अभिनेत्याला साजेशी गोष्ट नाही.’

मातृत्व बेतू शकत होतं जीवावर, तरीही चौथ्यांदा आई झाली हॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री

यानंतर काही दिवसांनी सर्व काही शांत झालं. ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केलं. तर हळूहळू सलमान आणि संजयचे संबंधही सुधारू लागले. आता असं म्हटलं जातं की लवकरच दोघं नव्या सिनेमात एकत्र काम करणार आहेत. संजय लीला भन्साळी यांच्या या सिनेमात सलमानसोबत त्याची सर्वात आवडती अभिनेत्री कतरिना कैफही असणार आहे.

SPECIAL REPORT: लग्नाआधीच सलमान खान होणार 'बाबा'?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 11, 2019 01:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...