बिग बॉसमधून नावारुपास अभिनेत्री जॅस्मिन भसीन सध्या प्रचंड चर्चेत आहे. म्यूझिक व्हिडीओ असो की रि अॅलिटी शो सर्वत्र तिचीच चर्चा पाहायला मिळत आहे.
2/ 10
आज जॅस्मिनचा वाढदिवस आहे. 31 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
3/ 10
आज जॅस्मिन यशाच्या शिखरावर आहे. पण एक काळ असाही होता जेव्हा तिनं सातत्यानं मिळणाऱ्या अपयशाला कंटाळून चक्क आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता.
4/ 10
तिनं झोपेच्या गोळ्यांचा ओव्हर डोस घेतला होता. परंतु तिची बिघडलेली अवस्था पाहून त्वरीत तिला रुग्णालयात भरती करण्यात आलं त्यामुळं तिचं आयुष्य वाचलं.
5/ 10
बिग बॉसच्या 14 व्या सिझनमध्ये एक टास्क करत असताना तिनं हा धक्कादायक अनुभन सांगितला. तिचा हा अनुभव ऐकून सलमान खाननं देखील आश्चर्य व्यक्त केलं होतं.
6/ 10
करिअरच्या सुरुवातीस ती सातत्यानं रिजेक्ट होत होती. अनेकांनी तिच्या शरीरयष्टीची देखील खिल्ली उडवली होती. आपण मनोरंजन क्षेत्रात यशस्वी होऊ का? याबाबत तिच्या मनात शंका निर्माण झाली परिणामी नैराश्येत जाऊन तिनं आत्महत्येचा निर्णय घेतला होता.
7/ 10
परंतु रुग्णालयात उपचार घेत असताना तिला प्रचंड वेदना जाणवत होत्या. शिवाय तिचे कुटुंबीय देखील प्रचंड दडपणाखाली जगत होते. या सर्व प्रकारामुळं तिला आपल्या चुकीची जाणिव झाली. अन् तिनं पुन्हा एकदा जोमानं प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला.
8/ 10
तिनं केलेली चूक इतर कोणी करु नये. आत्महत्या हे भीत्रेपणाचं लक्षण आहे. त्याऐवजी संकटांचा सामना करा. मिळालेलं अपयश तुम्हाला अनुभव देतं. अन् हाच अनुभव यशाच्या दिशेने तुम्हाला घेऊन जातो असा सल्ला देखील तिनं आपल्या चाहत्यांना दिला.
9/ 10
जॅस्मिन बिग बॉसच्या 14 व्या पर्वाची विजेती ठरली होती. तिचा रोखठोक अंदाज प्रेक्षकांना प्रचंड आवडला त्यामुळं तिला भरभरुन मतदान करण्यात आलं होतं.
10/ 10
जॅस्मन जमाई राजा या मालिकेतून खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली होती. त्यानंतर तिनं शक्ती, तू आशिकी है, कसौटी जिंदगी की, नच बलिये यांसारख्या अनेक सुपरहिट मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या.