• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • HBD: बँड ग्रुप सिंगर ते प्रसिद्ध बॉलिवूड गायक; असा होता विशाल दादलानीचा संगीतमय प्रवास

HBD: बँड ग्रुप सिंगर ते प्रसिद्ध बॉलिवूड गायक; असा होता विशाल दादलानीचा संगीतमय प्रवास

अनेक बॉलिवूड चित्रपटांसाठी विशालने संगीत दिलं आहे. याशिवाय अनेक सुपरहिट गाणीही गायली आहेत. विशालने एका बँड ग्रुप पासून आपल्या संगीत क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली होती.

 • Share this:
  मुंबई 28 जून : संगीत दुनियेतील एक मोठं नाव म्हणून प्रसिद्ध गायक विशाल दादलानीला (Vishal Dadlani) ओळखलं जातं. आजवर अनेक बॉलिवूड चित्रपटांसाठी विशालने संगीत दिलं आहे. याशिवाय अनेक सुपरहिट गाणीही गायली आहेत. विशालने एका बँड ग्रुप पासून आपल्या संगीत क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली होती. विशालचा जन्म बांद्रा, मुंबईत 28 जून 1973 ला एका हिंदू सिंधी कुटुंबात झाला होता. मुंबईच्या जय हिंद कॉलेज मधून तसेच एच आर कॉलेज मधून त्याने पदवी शिक्षण पूर्ण केलं होत. विशालला गायनात प्रचंड आवड होती. रॉक, पॉप म्युझिकचीही त्याला आवड होती. कॉलेज जीवनात तो ही गाणी ऐकायचा. 1994 साली विशालने पदवी शिक्षण पूर्ण केलं व 4 मित्रांचा एक बँड ग्रुप तयार केला. त्या ग्रुपचं नाव होतं पॅन्टाग्राम. विशालचा हा ग्रुप त्यावेळी एक प्रकारचा ट्रेण्ड बनला होता. यातून विशालने मोठी प्रसिद्धीही मिळवली होती. इंडो - रॉक बँड ला भारतात स्थान मिळवून देण्याचं कामच विशालच्या बँड ग्रूपने केलं होतं. त्यानंतर विशालची एक कंपोसर म्हणून ओळख बनली.
  View this post on Instagram

  A post shared by VISHAL (@vishaldadlani)

  यानंतर विशालला बॉलिवूडमध्ये जाण्यासाठी रस्ता मिळाला होता. शंकर एहसान लॉय यांच्यासोबत विशालला पहिलं गाणं गाण्याची संधी मिळाली. झूम बराबर झूम हे सुपरहिट गाणं त्याने गायलं होत. याचं दरम्यान विशालची ओळख शेखर रवजियानी याच्याशी झाली. या जोडीने नंतर इतिहासच बनवला आहे. शेखर - विशाल (Shekhar – Vishal) ही जोडी प्रचंड लोकप्रिय झाली. अनेक गाणी त्यांनी एकत्र गायली आहेत. सलाम नमस्ते, दोस्ताना, अंजाना अंजानी, झनकार बीट्स, दस, स्टूडंट ऑफ द ईयर, चेन्नई एक्सप्रेस, बँग बँग  यांसारख्या चित्रपटांसाठी विशाल - शेखर यांनी संगीत दिलं होतं. गेल्या 25 वर्षात विशालने अनेक सुपरहिट गाणी संगीतविश्वाला दिली. अनेक गाण्याचं त्याने लेखनही केलं. काही संगीतबद्ध केली तर काही त्याने गायली. शैतान का साला , जय जय शिवशंकर, स्वॅग से स्वागत अशी अनेक सुपहिट गाणी विशालने हिंदी, मराठी, पंजाबी, बंगाली , गुजराती भाषेतही गायली आहेत.
  Published by:News Digital
  First published: