मुंबई, 9 जुलै : दाक्षिणात्य सिनेमा ‘अर्जुन रेड्डी’चा हिंदी रिमेक असलेला कबीर सिंग बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला. या सिनेमात शाहिदनं साकारलेली सर्जनची भूमिका साउथमध्ये अभिनेता ‘विजय देवरकोंडा’नं साकारली होती. त्यानंतर विजय आता एक नव्या सिनेमाची तयारी करत असून या सिनेमात तो ब्राझिलियन मॉडेल इझाबेला लिटे हिच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच इझाबेलानं तिच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता ज्यामुळे सध्या सर्वत्र या दोघांच्या नावाची चर्चा सुरू आहे. इझाबेलानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर विजय सोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोला, ‘हा रावडी माझा सहकलाकार असल्याचा मला खूप अभिमान आहे. मी स्वतःला यासाठी भाग्यवान समजते.’ असं कॅप्शन दिलं होतं. मात्र या फोटोवरून सोशल मीडियावर विजय आणि इझाबेलाच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र या दोघांनीही यावर अद्याप तरी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या हे दोघं त्याच्या आगामी सिनेमाच्या तयारीमध्ये व्यग्र आहेत. संजय दत्तच्या ‘या’ मराठी सिनेमात येणार बॉलिवूडचा हुकूमी एक्का, पाहा टीझर
इझाबेलाचं नाव या अगोदर भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीशी जोडलं गेलं होतं. एवढंच नव्हे तर इझाबेलानं ती विराटला डेट करत असल्याचंही कबुल केलं होतं मात्र त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही आणि हे दोघंही वेगळे झाले. त्यानंतर 2017मध्ये विराटनं अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्न केलं. इझाबेलानं याआधी अनक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय ती ‘पुरानी जीन्स’, ‘सिक्सटीन’ आणि ‘मिस्टर मजनू’ या बॉलिवूड सिनेमांमध्ये दिसली होती. आगामी सिनेमामध्ये ती विजयच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. ट्रेंडी समर ड्रेसमध्ये दिसला मलायकाचा हॉट लुक, एकदा हे फोटो पाहाच
या सिनेमाच्या कथेबद्दल बोलायचं तर ही कथा फ्रान्समध्ये सेटल झालेल्या एका जोडप्याची आहे. ज्यात नंतर फ्लॅशबॅक सीन्स सुरू होतात आणि नायक त्याच्या भूतकाळातील नात्यांविषयी बोलायला सुरूवात करतो. सध्या या सिनेमाच्या शेवटच्या काही भागाचं शूट सुरु आहे. याशिवाय विजय देवरकोंडा डिअर कॉमरेड या सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन भारत कामा करत असून यात विजय सोबत अभिनेत्री रश्मिका मंडाना दिसणार आहे. हा सिनेमा येत्या 26 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘माझ्याविरुद्ध लिहितोस..’ भर पत्रकार परिषदेत रिपोर्टरवर भडकली कंगना रणौत =================================================================== SPECIAL REPORT: बॉटल कप चॅलेंजचा ‘हा’ नवा ट्रेन्ड तुम्ही पाहिला का?

)







