लग्नाच्या 3 वर्षानंतर विराट-अनुष्का घेणार घटस्फोट? सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे #VirushkaDivorce

लग्नाच्या 3 वर्षानंतर विराट-अनुष्का घेणार घटस्फोट? सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे #VirushkaDivorce

याआधी अनुष्काची बहुचर्चित वेब सीरिज 'पाताललोक' रिलीज झाल्यानंतर भाजपाचे आमदार नंदकिशोर गुर्जर (Nandkishore Gurjar) यांनी विराट अनुष्काच्या घटस्फोटाची मागणी केली होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 06 जून : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलिवूडची टॉप अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) नेहमीच आपल्या रोमॅंटिक फोटोमुळं चर्चेत असतात. विरुष्का नावानं ही जोडी ओळखली जाते, मात्र आता विराट आणि अनुष्का यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचा चर्चा सुरू झाल्या आहेत. 2017मध्ये विवाह केल्यानंतर विराट-अनुष्का यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत आहेत. ट्विटरवर तर #VirushkaDivorce ट्रेंड होत आहे.

याआधी अनुष्काची बहुचर्चित वेब सीरिज 'पाताललोक' रिलीज झाल्यानंतर भाजपाचे आमदार नंदकिशोर गुर्जर (Nandkishore Gurjar) यांनी विराट अनुष्काच्या घटस्फोटाची मागणी केली होती. भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी त्यांच्या परवानगी शिवाय त्यांचा फोटो गुन्हेगारासोबत वापरून देशद्रोहाचं काम केल्याचा आरोप अनुष्कावर केला होता. तसेच गुर्जर समुदायाचे चुकीचे चित्रण या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे असे म्हटले होते. या वादावरुन भाजपा आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी विराट कोहलीने आता अनुष्काला घटस्फोट द्यावा अशी खळबळजनक मागणी केली होती. यानंतर ट्विटरवर युझरनं पोस्ट करण्यास सुरुवात केली. यातून #VirushkaDivorce ट्रेंड होण्यास सुरुवात झाली.

वाचा-भाजप आमदारानं केली विराट-अनुष्काच्या घटस्फोटाची मागणी, 'पाताललोक'वरून नवा वाद

#VirushkaDivorce ट्रेंड सुरू झाल्यानंतर लोकांनी यावर मिम्सही तयार केले आहेत. शुक्रवारी रात्री #VirushkaDivorce टॉप 10 ट्रेंडमध्ये होता.

वाचा-विराट कोहलीचा Dinosaur Walk पाहिला का? सोशल मीडियावर Memes चा पाऊस

दरम्यान, काही दिवसांपूर्वी लॉयर गिल्ड मेंबर वीरेन सिंह गुरुंग यांनी पाताललोक वेब सीरिजमुळे निर्माती अनुष्का शर्माला लीगल नोटीस पाठवली आहे. अनुष्का शर्माला 18 मे ला पाठवलेल्या या नोटीसमध्ये वीरेन सिंह गुरुंग यांनी या वेबसीरिजमध्ये जाती सूचक शब्दांचा वापर केला गेला असल्याचा आरोप केला आहे. ज्यामुळे नेपाळी समुदायाचा अपमान झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. वीरेन यांनी सांगितलं, या वेबसीरिजच्या पहिल्या सीझनच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये 3 मिनिटं आणि 41 सेकंदांच्या चौकशी दरम्यान एक महिला पोलिस संबंधित नेपाळी भूमिका साकारलेल्या व्यक्तीला जातीवादी शिव्या देते.

वाचा-भूटानमध्ये असं काय घडलं की, अनुष्काला अर्ध्या रस्त्यात सोडून पळून गेला विराट

First published: June 6, 2020, 10:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading