भाजप आमदारानं केली विराट-अनुष्काच्या घटस्फोटाची मागणी, 'पाताललोक'वरून नवा वाद

भाजप आमदारानं केली विराट-अनुष्काच्या घटस्फोटाची मागणी, 'पाताललोक'वरून नवा वाद

गाझियाबादमधील भाजपाचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी विराट अनुष्काच्या घटस्फोटाची मागणी केली आहे.

  • Share this:

मुंबई, 26 मे : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिची बहुचर्चित वेब सीरिज 'पाताललोक' रिलीज झाली. पण प्रदर्शनानंतर आता ही वेबसीरिज वादात सापडली आहे. काही दिवसांपूर्वी गोरखा समाजाचा अपमान केल्यानं अनुष्का शर्मा कायदेशीर नोटीस पाठण्यात आल्यानंतर आता या वेब सीरिजमुळे नवा वाद उभा राहिला आहे. आपली प्रतिमा खराब केल्याचा आरोप करत गाझियाबादमधील भाजपाचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी विराट अनुष्काच्या घटस्फोटाची मागणी केली आहे.

भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी त्यांच्या परवानगी शिवाय त्यांचा फोटो गुन्हेगारासोबत वापरून देशद्रोहाचं काम केल्याचा आरोप अनुष्कावर केला आहे. तसेच गुर्जर समुदायाचे चुकीचे चित्रण या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे असे म्हटले होते. या वादावरुन भाजपा आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी विराट कोहलीने आता अनुष्काला घटस्फोट द्यावा अशी खळबळजनक मागणी केली आहे.

अनुष्का शर्माची पहिलीच वेबसीरिज वादाच्या भोवऱ्यात, लॉकडाऊनमध्ये मिळाली लीगल नोटीस

‘न्यूजरुम पोस्ट’ने या संदर्भात नंदकिशोर गुर्जर यांची मुलाखत घेतली. त्यामध्ये त्यांनी, ‘देशापेक्षा कोणीही मोठे असू शकत नाही. विराट कोहली आजवर देशासाठी खेळत आला आहे. त्याने देशाचे नाव मोठे केले आहे. तो देशभक्त आहे. मात्र अनुष्का या वेबसीरिजची निर्माती असून तिनं अशाप्रकारे देशद्राहाचं काम केलं आहे त्यामुळे विराटनं अनुष्काला तातडीने घटस्फोट द्यायला हवा. अनुष्का विराटसोबत राहत आहे. तिने राष्ट्रदोहाचे काम केले आहे’ असे म्हणत त्यांनी विराटला सल्ला दिला आहे. त्यांच्या या मुलाखतीचा व्हिडीओ न्यूजरुम पोस्टनं ट्विटरवर शेअर केला आहे.

काही दिवसांपूर्वी नंदकिशोर गुर्जर यांनी एक पत्रक जारी केले होते. या पत्रकामध्ये अनुष्का शर्माने तिच्या वेब सीरिजमध्ये नंदकिशोर गुर्जर यांचा फोटो एका गुन्हेगारासोबत दाखवला होता. तसेच तो दाखवण्याआधी तिने त्यांची संमती घेतली नव्हती. या कृत्यातून तिने गुर्जर समुदायाचा अपमान केला आहे. गुर्जर समुदायाचे चुकीचे चित्रण या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे. त्यामुळे पाताल लोक या वेब सीरिजवर बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली होती.

'पाताललोक'मध्ये जयदीप अहलावत, नीरज काबी, अभिषेक बनर्जी, स्वस्तिका मुखर्जी, निहारिका, जगजीत, गुल पनाग या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या वेब सीरीजचं लेखन सुदीप शर्मानं केलं आहे. ही वेबसीरिज अमेझॉन प्राइमवर रिलीज करण्यात आली आहे.

...जेव्हा जखमी वरुणचा बाबा डेव्हिड धवन यांनी सेटवर सर्वांदेखत केला अपमान

गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी तरुणानं सोनू सूदकडे मागितली मदत, मिळालं धम्माल उत्तर

First published: May 26, 2020, 7:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading