Home /News /entertainment /

भूटानमध्ये असं काय घडलं की, अनुष्काला अर्ध्या रस्त्यात सोडून पळून गेला होता विराट

भूटानमध्ये असं काय घडलं की, अनुष्काला अर्ध्या रस्त्यात सोडून पळून गेला होता विराट

विराट आणि अनुष्काच्या भूटान ट्रीपवेळी नेमकं असं काय घडलं की विराट तिला सोडून पळून गेला...

    मुंबई, 20 मे : कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळातही अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा पती विराट कोहली कोणत्या कोणत्या कारणानं चर्चेत राहिले आहेत. लॉकडाऊनच्या काळात विराट अनुष्काबद्दल अनेक किस्से चाहत्यांशी शेअर केले आहेत ज्यामुळे तो सतत चर्चेत असतो. आताही त्यांनं अनुष्का आणि त्याच्या मागच्या वर्षीच्या भूटान ट्रीपच्या वेळचा एक मजेदार किस्सा शेअर केला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विराट कोहलीनं नुकताच फुटबॉलपटू सुनील छेत्रीसोबत एका लाइव्ह सेशनमध्ये भाग घेतला होता. यावेळी त्यानं अनुष्काशी संबंधीत हा किस्सा शेअर केला आणि सांगितलं की, हे सर्व जेव्हा घडलं तेव्हा अनुष्कानं तिच्याशी बोलणं बंद केलं होतं. या लाइव्ह चॅटमध्ये सुनील छेत्रीनं विराटला विचारलं, तुमच्या भूटान ट्रीपच्या वेळी असं काय झालं होतं ज्यामुळे तू अनुष्काच्या अर्ध्या रस्त्यातच सोडून पळून गेला होतास. लॉकडाऊनमध्ये सुश्मिता सेननं सांगितली तिची 'लव्ह स्टोरी', पाहा VIDEO सुनील छेत्रीच्या या प्रश्नाचं उत्तर देताना विराट म्हणाला, आम्ही भूटानला गेलो होतो. आम्ही दोघंही बाइकवर निघालो होतो. दोघंही एकत्रच बाइक चालवत होतो आणि त्यावेळी तिथे भारतीय पर्यटक सुद्धा आले होते. मी मध्येच एका ठिकाणी गर्दी पाहिली. त्यांच्यातला एक म्हणत होता हा तर विराटसारखा दिसतो. मी ते ऐकलं आणि माहित नाही माझ्या डोक्यात काय आलं मी बाइकचा स्पीड वाढवला आणि पुढे निघून गेलो आणि अनुष्का मागेच राहिली. नंतर जेव्हा मी तिच्याकडे गेलो तर ती माझ्याकडे बघत सुद्धा नव्हती ना नीट बोलत होती. VIDEO : शकिराच्या गाण्यावर उर्वशी रौतेलाचा Belly Dance, मादक अदांवर चाहते फिदा विराट कोहलीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. विराट-अनुष्काच्या एका फॅनपेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सध्या विराट आणि अनुष्का त्यांच्या मुंबईच्या घरी क्वारंटाइन आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी या दोघांचा क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. ज्यात हे दोघं त्यांच्या अपार्टमेंटच्या बाजूच्या मोकळ्या जागेत क्रिकेट खेळत होते. बोनी कपूर यांच्या घरापर्यंत पोहोचला कोरोना, वडीलांसह जान्हवी-खुशी क्वारंटाइन
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Anushka sharma, Virat kohali

    पुढील बातम्या