मुंबई, 22 मे : लॉकडाऊनच्या काळात मीम बनवणाऱ्यांनी सोशल मीडियावर खूपच प्रसिद्धी कमावली आहे. अगदी कोणत्या गोष्टीचं मीम बनेल हे काही सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर हिट होत असलेलं मीम म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा ‘डायनोसॉर वॉक’. अगदी काहीच दिवसांपूर्वी अनुष्का शर्माने तिच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवर विराटचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओला तिने कॅप्शन दिलं आहे की, ‘पळून गेलेल्या डायनोसॉर मी पाहिलाय’. यामध्ये विराट कोहली डायनोसॉरची चाल तर चालत आहेच पण एक विचित्र आवाज देखील काढत आहे. विराटच्या या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर क्रिएटीव्हिटीला तर उधाण आहे आहे. कुणी याला ‘अनुष्का पार्क’ म्हणत आहे तर कुणी हृतिक रोशनच्या ‘its magic’ गाण्याबरोबर विराटचा फोटो एडिट केला आहे. एकंदरितच हे सर्व मीम्स हसून हसून पोट दुखायला लावणारे आहेत.
when anushka's internet goes down pic.twitter.com/0pw6fkRCiM
— Fake Ad Co (@thefakeadco) May 20, 2020
— SDLOH (@iamjitusrivas) May 20, 2020
संकलन, संपादन - जान्हवी भाटकर