मुंबई, 24 मार्च : कोरोना व्हायरसनं (Coronavirus) सध्या सगळीकडे थैमान घातलं आहे. देशभरात सध्या 450 पेक्षा जास्त रुग्ण कोरोनाग्रस्त आहेत. ज्यामुळे सध्या भारतातील जवळपास सर्वच ठिकाणी लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवली आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीसुद्धा या व्हायरसमुळे ठप्प झाली आहे. त्यामुळे या इंडस्ट्रीत काम रोजगारावर काम करणाऱ्या लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पण बॉलिवूडचा व्हिलन प्रकाशराज मात्र या परिस्थितीत या लोकांचा हिरो ठरला आहे. त्यानं असं काही केलं आहे ज्याची शिकवण खरं तर सर्व स्टार्सनी घ्यायला हवी.
बॉलिवूडमध्ये व्हिलनची भूमिका साकारणारा प्रकाशराज सध्या कोरोना व्हायरसच्या संकटात त्याच्या स्टाफचा हिरो ठरला आहे. प्रकाशराजनं त्याच्या प्रॉडक्शन हाउसमध्ये काम करणाऱ्या सर्व स्टाफला मे महिन्यापर्यंतचा पगार आत्ताच देऊन टाकला आहे. ज्यामुळे सध्या सर्वजण प्रकाशराजचं सोशल मीडियावर कौतुक करताना दिसत आहेत. एवढंच नाही तर त्यानं त्याच्या स्टाफला सध्या सुट्टीवर पाठवलं आहे.
VIDEO : कतरिनाला घरात भांडी घासताना पाहून अर्जुन कपूरनं उडवली खिल्ली
प्रकाशराजनं त्याच्या ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. ज्यात त्यानं लिहिलं, जनता कर्फ्यू... माझ्या जमा फंडकडे पाहा, माझं फार्म, घर, फिल्म प्रॉडक्शन, संस्था आणि इतर स्टाफच्या सर्वांना मी मे महिन्यापर्यंतची सॅलरी अगोदरच देऊन टाकली आहे. तसेच सोशल डिस्टेंसिंगमुळे मी माझ्या आगामी तीन सिनेमात रोजच्या वेतनावर काम करणाऱ्या कर्माचाऱ्या निम्म्याहून जास्त वेतन दिलं आहे. पुढेही त्यांच्यासाठी काही ना काही करत राहणारच आहे.
प्रकाशराज यांनी त्यांच्या या ट्वीटमध्ये त्यांच्या चाहत्यांना अशा लोकांची मदत करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी लिहिलं, माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की, अशा लोकांना नक्की मदत करा ज्यांना तुमच्या मदतीची खरंच खूप जास्त गरज आहे. आपल्या जीवनात काहीतरी परत करण्याची हीच वेळ आहे. एकमेकांची मदत करण्याची खरी वेळ आता आली आहे.
चाहत्यांनी लग्नाबद्दल विचारताच सोनाक्षी सिन्हाचं विचित्र उत्तर
सध्या सोशल मीडियावर प्रकाशराज यांच्या या कामाचं खूप कौतुक केलं जात आहे. प्रकाशराज यांच्या अगोदर अभिनेता मनिष पॉलनं सुद्धा त्याच्या स्टाफला एडवान्स सॅलरी देऊन सुट्टीवर पाठवलं आहे.
कोरोनाला हरवण्यासाठी डॉक्टरांवर आधारित या प्रसिद्ध सिरीजची मोठी मदत मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.