Home /News /entertainment /

ऋषी कपूर यांच्या योगा Video वर आलियाची कमेंट, चाहते म्हणतात; 'कपूर घराण्याची...'

ऋषी कपूर यांच्या योगा Video वर आलियाची कमेंट, चाहते म्हणतात; 'कपूर घराण्याची...'

नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर ऋषी कपूर यांचा योगा व्हिडीओ शेअर केला आहे. जो आलियाच्या कमेंटमुळे सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

  मुंबई, 24 मार्च : कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे सध्या जनतेला आवश्यक असलेल्या सर्व सोईसुविधा बंद आहेत. ज्यामुळे फक्त सर्वसामान्यच नाही तर अनेक सेलिब्रेटींची सुद्धा गैरसोय होताना दिसत आहे. जिम हा त्यांच्या लाइफस्टाइलचा अत्यावश्यक भाग आहे. मात्र या व्हायरसमुळे सध्या जीम सुद्धा बंद आहेत. त्यामुळे सध्या सर्वच सेलिब्रेटी घरी राहूनच होम वर्कआउटला प्राधान्य देताना दिसत आहेत. अनेक बॉलिवूड स्टार्सनी त्यांच्या वर्कआउटचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यात अभिनेता ऋषी कपूर यांचाही समावेश आहे. ऋषी कपूर यांची पत्नी नीतू कपूर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर ऋषी यांचा योगा व्हिडीओ शेअर केला आहे. जो आलिया भटच्या कमेंटमुळे सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. नीतू कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर ऋषी कपूर यांचा योगा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ते त्यांच्या योगा ट्रेनरकडून व्हिडीओ कॉलवरुन ट्रेनिंग घेताना दिसत आहेत. नीतू कपूर यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर आलिया भटनं सुद्धा कमेंट केली आहे. जी नंतर नीतू कपूर यांनी लाइक केली आहे. आलियानं या व्हिडीओवर कमेंट करताना लिहिलं, ‘सुपर’ आलियाची कमेंट पाहताच रणबीर-आलियाच्या अनेक चाहत्यांनी यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. चाहत्यांनी आलियाला तीच कपूर घराण्याची परफेक्ट सून होऊ शकते असं म्हटलं आहे. चाहत्यांनी लग्नाबद्दल विचारताच सोनाक्षी सिन्हाचं विचित्र उत्तर
  आलिया भट आणि रणबीर कपूर मागच्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहे. एका इव्हेंट फंक्शनमध्ये आलियानं खुलेआम रणबीरवर आपलं प्रेम असल्याचं कबुल केलं होतं. त्यानंतर लवकरच हे दोघं लग्न करतील अशा चर्चा सुरू आहेत. पण काही दिवसांपूर्वी या दोघांमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचं बोललं जात होतं मात्र आता या व्हिडीओवरील कमेंट पाहता या दोघांमध्ये कोणताही दुरावा नाही हे समजून येतं. हे दोघंही लवकरच अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमात एकत्र दिसणार आहेत. कोरोनाला हरवण्यासाठी डॉक्टरांवर आधारित या प्रसिद्ध सिरीजची मोठी मदत जंगलामध्ये थरारक स्टंट करताना दिसणार थलायवा!टेलिव्हिजन डेब्यू आज होणार प्रदर्शित
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood

  पुढील बातम्या