Home /News /entertainment /

हेमा मालिनीकडे दिग्दर्शकानं केली होती बिकिनी सीनची मागणी, धर्मेंद्र यांनी सर्वांसमोर लगावली कानशिलात

हेमा मालिनीकडे दिग्दर्शकानं केली होती बिकिनी सीनची मागणी, धर्मेंद्र यांनी सर्वांसमोर लगावली कानशिलात

एका सिनेमाच्या सेटवर धर्मेंद्र यांनी चक्क दिग्दर्शकाच्याच कानाखाली मारल्याचा किस्सा हेमा यांनी एका मुलखतीत शेअर केला.

  मुंबई, 24 मार्च : अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र ही एकेकाळची बॉलिवूडची सर्वाधिक हिट जोडी मानली जाते. या दोघांनी त्यांच्या काळात अनेक हिट सिनेमे दिले होते. रिल लाइफमधील हे कपल कालांतरानं रिअल लाइफमध्येही एकत्र आलं. लग्नाच्या एवढ्या वर्षांनंतर हे कपल सध्या बॉलिवूडचं आयडल कपल म्हणून ओळखलं जातं. नुकतीच या जोडीनं मुलगी इशाच्या पुस्तक प्रकाशनाच्या प्रमेशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी हेमा यांनी धर्मेंद्र यांच्याबद्दल अनेक किस्से प्रेक्षकांशी शेअर केले. कपिल शर्मा शोमध्ये हेमा यांनी त्यांच्या एका सिनेमाच्या सेटवरील खूपच रंजक किस्सा शेअर केला. एका सिनेमाच्या सेटवर धर्मेंद्र यांनी हेमा मालिनींसाठी चक्क दिग्दर्शकाच्याच कानाखाली मारल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. हेमा म्हणाल्या, ‘त्यावेळी मी ‘क्रोधी’ या सिनेमाचं शूट करत होते. या सिनेमात माझ्या अपोझिट धर्मेंद्र यांना कास्ट करण्यात आलं होतं. या सिनेमाचे दिग्दर्शक होते सुभाष घई.’ ऋषी कपूर यांच्या योगा Video वर आलियाची कमेंट, चाहते म्हणतात; 'कपूर घराण्याची...'
  हेमा पुढे म्हणाल्या, ‘सुभाष घई यांनी मला सिनेमातील स्विमिंग पूलच्या एका सीनसाठी बिकिनी घालण्यास सांगितलं होतं सुरुवातीला मी नकार दिला मात्र त्यांच्या आग्रहामुळे नंतर मी बिकिनी घातली. मात्र हा प्रकार जेव्हा धर्मेंद्र यांना समजला त्यावेळी त्यांनी सर्वांदेखत सुभाष घईंच्या कानाखाली मारली होती. शेवटी क्रू मेंबर्सनी मध्ये पडत या दोघांमधील भांडण मिटवलं.’ VIDEO : कतरिनाला घरात भांडी घासताना पाहून अर्जुन कपूरनं उडवली खिल्ली हेमा मालिनी यांनी या शोमध्ये धर्मेंद्र यांनी दोन्ही मुलींच्या जन्माच्या वेळी संपूर्ण हॉस्पिटल बुक केल्याचा किस्साही शेअर केला. धर्मेंद्र यांचं त्यांच्या दोन्ही मुलींवर खूप प्रेम आहे आणि त्यामुळे त्यांचं असं वागणं अगदी स्वाभाविक होतं असंही त्या यावेळी म्हणाल्या. इशा देओलचं पेरेंटिंगवर आधारित ‘अम्मा मिया’ हे पुस्तक प्रकाशित होत आहे. याच्या प्रमोशनसाठी संपूर्ण देओल कुटुंबानं या शोमध्ये हजेरी लावली होती. चाहत्यांनी लग्नाबद्दल विचारताच सोनाक्षी सिन्हाचं विचित्र उत्तर
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood

  पुढील बातम्या