Home /News /entertainment /

पूजा बेदीनं केली गोवा क्वारंटाइन सेंटरची पोलखोल, समोर आला धक्कादायक VIDEO

पूजा बेदीनं केली गोवा क्वारंटाइन सेंटरची पोलखोल, समोर आला धक्कादायक VIDEO

पूजा बेदीच्या गोव्याला जाण्यावरुन तिला सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आलं असलं तरी आता तिनं शेअर केलेल्या व्हिडीओमुळे गोवा क्वारंटाइन सेंटरची पोलखोल झाली आहे...

    मुंबई, 20 मे : बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदीची सध्या सगळीकडेच चर्चा सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळातच होणारा नवरा मानेकसोबत गोव्याला रवाना झाल्यामुळे सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं आहे. देशभरात सध्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. अशात गोव्यात पोहोचलेल्या पूजा बेदीला अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे. तिनं तिच्या ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यानंतर गोवा सरकार आणि तिथल्या प्रशासनाच्या वैद्यकीय व्यवस्थेवर सवाल उठले आहेत. आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत गोव्यात पोहोचलेल्या पूजा बेदीनं तिथे गेल्यावर लगेचच तिथलं क्वारंटाइन सेंटर गाठलं. पण तिथे गेल्यावर तिनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत तिथल्या वैद्यकीय व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या व्हिडीओमध्ये पूजा म्हणाली, माझा होणारा नवरा जो मूळ गोव्यात राहणारा आहे. त्याच्यासोबत मी गोव्यात येण्यावर अनेक वाद सुरू आहेत. आम्ही सर्व बुकींग केल्यावरच या ठिकाणी आलो आहोत. गोवा सरकार आणि डीसीपी मुंबई या ठिकाणी ऑनलाइन नोंद केली, यासोबत प्रत्येक चेक पोस्टवर थांबलो. इथे आल्यावर इथल्या हॉस्पिटलमध्ये कोविड टेस्ट केली आणि एक रात्र या क्वारंटाइन सेंटरमध्ये काढली. पण तुम्ही हा व्हिडीओ पाहा आणि जाणून घ्या की इथल्या सुविधांमुळे का त्रास झाला. कोरोना वॉरियर्स पोलिसांना निवेदिता आणि अशोक सराफ देणार गोड भेट! या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, या सेंटरमधला बेड खूप मळलेला आहे. ज्यावर एक चादर घातलेली आहे. तिथल्या टीव्हीवरही धूळ साचलेली आहे. याशिवाय पूजानं तिथल्या बाथरुमची अवस्था कशी आहे हे देखील सांगितलं आहे. या व्हिडीओमध्ये पूजा सांगते इथे येण्याआधी लोकांना कोरोना व्हायरस असो किंवा नसो पण इथे आल्यावर मात्र लोकांना कोरोनाचं संक्रमण होऊ शकतं. याशिवाय पूजा बेदीनं आणखी एक ट्वीट केलं आहे. ज्यात तिनं सांगितलं, या अशाप्रकारच्या अस्वच्छतेमुळे या ठिकाणी कोरोना व्हायरसचं संक्रमण होऊ शकतं. अशात जर कोरोना न झालेल्या लोकांनी गोव्यात एंट्री केली तर त्यांना अशा प्रकारच्या अस्वच्छ क्वारंटाइन सेंटरमुळे कोरोना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे ट्वीट केलं आहे. मात्र सर्वांचं लक्ष माझ्या गोव्यात येण्यावरच लागलं आहे. भूटानमध्ये असं काय घडलं की, अनुष्काला अर्ध्या रस्त्यात सोडून पळून गेला विराट मसाबा गुप्ता पुन्हा प्रेमात! या अभिनेत्रीच्या Ex Husband ला करतेय डेट
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Bollywood, Coronavirus

    पुढील बातम्या