घटस्फोटानंतर मसाबा गुप्ता पुन्हा प्रेमात! या अभिनेत्रीच्या Ex Husband ला करतेय डेट

घटस्फोटानंतर मसाबा गुप्ता पुन्हा प्रेमात! या अभिनेत्रीच्या Ex Husband ला करतेय डेट

अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्तानं 2018 मध्ये पती दिग्दर्शक मधू मंटेनापासून घटस्फोट घेतला.

  • Share this:

मुंबई, 20 मे : सध्या लॉकडाऊनच्या काळात कलाकाराचे इतर वेगवेगळे पैलू समोर येत आहे. कोण चांगलं स्केच करतय तर कोण कविता करतंय, कोण आपले मागे राहिलेले छंद जोपासतंय. पण या सगळ्यात काही नव्या नात्यांचे खुलासे सुद्धा झाले आहेत. यापैकीच एक आहे अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ता. मसाबा गुप्ता घटस्फोटानंतर आता अभिनेता सत्यदीप मिश्रासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जातं. एवढंच नाही तर सध्या सत्यदीप आणि मसाबा गोव्यात एकमेकांसोबत टाइम स्पेंड करत असल्याचं बोललं जात आहे.

अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्तानं 2018 मध्ये दिग्दर्शक पती मधू मंटेनापासून घटस्फोट घेतला. त्यानंतर आता ती सत्यदीप मिश्राच्या प्रेमात असल्याचं बोललं जात आहे. हे दोघं लॉकडाऊनच्या अगोदर गोव्यात व्हेकेशनसाठी गेले होते. मात्र अचानक लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर ते पुन्हा मुंबईमध्ये परतले नाहीत. सध्या हे दोघंही गोव्यात अडकल्याचं बोललं जात आहे.

अभिनेता सत्यदीप मिश्रा हा बॉलिवूड अभिनेत्री आणि हैदराबादची प्रिन्सेस अदिती राव हैदरी हिचा पती आहे. 2009 मध्ये सत्यदीप आणि अदितीचं लग्न झालं होतं मात्र लग्नाच्या अवघ्या काही वर्षांनंतर म्हणजेच 2013 मध्ये हे दोघं कायदेशीर घटस्फोट घेत वेगळे झाले. तर मसाबा गुप्ता आणि मधू मंटेना यांनीही 2018 मध्ये परस्पर संमत्तीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

सध्या लॉकडाऊनमुळे मसाबा आणि सत्यदीप गोव्यात अडकले आहेत अशी माहिती समोर आली असली तरी याबाबत या दोघांकडून कोणत्याही प्रकारची पुष्टी झालेली नाही. सत्यदीप मिश्राला बॉलिवूडच्या 'फोबिया', 'स्मोक', 'टाइगर्स', 'लव ब्रेकअप्स जिंदगी' या सिनेमांसाठी ओळखलं जातं. त्यानं 2011 मध्ये आलेल्या 'नो वन किल्ड जेसिका' या सिनेमातून आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. सध्या तो मसाबासोबतच्या नात्यामुळे चर्चेत आला आहे.

VIDEO : शकिराच्या गाण्यावर उर्वशी रौतेलाचा Belly Dance, मादक अदांवर चाहते फिदा

बोनी कपूर यांच्या घरापर्यंत पोहोचला कोरोना, वडीलांसह जान्हवी-खुशी क्वारंटाइन

First published: May 20, 2020, 10:50 AM IST

ताज्या बातम्या