मुंबई, 20 मे : चीनच्या वुहान शहरापासून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसनं आतापर्यंत संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. भारतातही या व्हायरसचं संक्रमण दिवसेंदिवस वाढत असून त्यातही महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ज्यामुळे केंद्र सरकारनं लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवलं आहे. या सर्व परिस्थित सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतायत ते आपले कोरोना वॉरियर्स म्हणजेच पोलीस, डॉक्टर, नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचारी.
सध्याची महाराष्ट्रातली परिस्थिती पाहता अनेक सेलिब्रेटींनी मदतीचा हात दिला आहे. ज्यात मराठी सेलिब्रेटी सुद्धा मागे नाही. अनेक मराठी सेलिब्रेटींनी वेगवेगळ्या माध्यामातून लोकांना मदत केली आहे. याशिवाय अनेक पोलिस आपला जीव संकटात घालून देशसेवा करत आहेत. या व्हायरसचं संक्रमण कुटुंबाला होऊ नये म्हणून अनेक पोलीस सध्या पोलीस ठाण्यातच राहत आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्राची लोकप्रिय जोडी निवेदिता आणि अशोक सराफ जनतेसाठी झटणाऱ्या पोलिसांना एक गोड भेट देण्याचं ठरवलं आहे.
आपला जीव धोक्यात घालून देशाची सेवा करणाऱ्या या पोलिसांना निवेदिता आणि अशोक सराफ आमरस-पुरी खाऊ घालणार आहेत. विशेष म्हणजे या पोलिसांसाठी निवेदिता सराफ स्वतःच्या हातांना आमरस-पुरी तयार करणार आहेत. निवेदिता आणि अशोक सराफ पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही छोटीशी गोड मेजवानी त्यांनी देणार आहेत. ओशिवरा पोलीस ठाण्यातील पोलिसांना निवेदिता आणि अशोक सराफ यांच्याकडून हे जेवण देण्यात येणार आहे.
भूटानमध्ये असं काय घडलं की, अनुष्काला अर्ध्या रस्त्यात सोडून पळून गेला विराट
मसाबा गुप्ता पुन्हा प्रेमात! या अभिनेत्रीच्या Ex Husband ला करतेय डेट मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.