जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / मलायकानं शेअर केला YOGA VIDEO, अर्जुन कपूरच्या काकानं केली ‘ही’ कमेंट

मलायकानं शेअर केला YOGA VIDEO, अर्जुन कपूरच्या काकानं केली ‘ही’ कमेंट

मलायकानं शेअर केला YOGA VIDEO, अर्जुन कपूरच्या काकानं केली ‘ही’ कमेंट

अर्जुन कपूरचा काका अभिनेता संजय कपूरच्या कमेंटनं सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 26 नोव्हेंबर : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फिटनेस-योगा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच मलायकानं तिचा योगा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. ज्यात ती खूपच कठीण योगा करतना दिसत आहे. मलयाकाच्या फोटो किंवा व्हिडीओवर अर्जुन कपूर नेहमीच कमेंट करताना दिसतो. पण यावेळी मात्र त्याचा काका अभिनेता संजय कपूरनं मलायकाच्या या योगा व्हिडीओवर कमेंट केली आहे. मलायकानं तिच्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करताना लिहिलं, हे जग अनेक आव्हानांना कवेत घेतलेली एक सुंदर जागा आहे. आपला प्रवास आपल्याला बदलून टाकतो. फक्त एक गोष्ट बदलत नाही ती म्हणजे आपल्याला गरजेची असलेली ताकद. माझं नेहमीच असं म्हणणं आहे की आपल्याला जमेल त्या ठिकाणी झुकायला शिकलं पाहिजे. ज्यामुळे फार कमी वेळा आपण तूटून जाऊ आणि मी इथे माझ्या क्षमतेची सीमा आणखी वाढवते. मलायकाच्या व्हिडीओसोबतच तिचं कॅप्शन सुद्धा प्रेरणादायी आहे. मलायकाच्या फिटनेसचे अनेक चाहते आहेत. वयाच्या 45 व्या वर्षीही फिटनेसच्या बाबतीत सर्वात पुढे असणारी अभिनेत्री म्हणून तिचं नाव घेतलं जातं. सिद्धार्थ-रश्मीचा स्विमिंग पूलमध्ये रोमान्स, शहनाझनं शूट केला VIDEO

जाहिरात

मलायकाच्या या व्हिडीओवर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी कमेंट केल्या आहेत. फराह खाननं लिहिलं, ‘ओह माय गॉड कमीनी…’ पण अर्जुन कपूरचा काका अभिनेता संजय कपूरच्या कमेंटनं सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. संजयनं लिहिलं, ‘वाह..!!’ मलायका अरोरा अर्जुन कपूरच्या कुटुंबीयांच्या खूप जवळची व्यक्ती बनली आहे. खास करुन संजय कपूर आणि त्याच्या फॅमिलीसोबत काही दिवसांपूर्वी तर हे सर्वजण एकत्र व्हेकेशन एंजॉय करताना दिसले होते. OMG! आलिया भटचं ‘मेल व्हर्जन’, सोशल मीडियावर PHOTO VIRAL अर्जुन कपूर आणि मलायकाच्या नात्याविषयी बोलायचं तर या दोघांनी काही काळापूर्वीच त्यांचं नातं सर्वांमोर मान्य केलं होतं. त्यानंतर हे दोघंही लवकरच लग्नाच्या बेडीत अडकतील असे कयास लावले जात होते. पण या दोघांनीही यात तथ्य नसल्याचं सांगत एवढ्यात तरी लग्नाचा कोणाताही प्लान नसल्याचं स्पष्ट केलं. अर्जुनच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर त्याची मुख्य भूमिका असलेला पानीपत हा सिनेमा येत्या 6 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमासाठी त्यानं खूप मेहनत घेतली होती त्यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो याविषयी खूप उत्सुकता आहे. Housefull 4 आणि Marjaavaan च्या साउंड टेक्निशियनचा ब्रेन हॅमरेजने मृत्यू ==============================================================

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात