जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Housefull 4 आणि Marjaavaan च्या साउंड टेक्निशियनचा ब्रेन हॅमरेजने मृत्यू

Housefull 4 आणि Marjaavaan च्या साउंड टेक्निशियनचा ब्रेन हॅमरेजने मृत्यू

Housefull 4 आणि Marjaavaan च्या साउंड टेक्निशियनचा ब्रेन हॅमरेजने मृत्यू

अनेक सुपरहिट सिनेमांच्या साउंडसाठी काम पाहिलेला तरुण आणि टॅलेंटेड टेक्निशिनयन निमिश पिळनकर याचं हाय ब्लड प्रेशरमुळे ब्रेन हॅमरेज झाल्यानं निधन झालं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 नोव्हेंबर : Housefull 4 आणि Marjaavaan या सिनेमांचा साउंड टेक्निशियनचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झाला आहे. अनेक सुपरहिट सिनेमांच्या साउंडसाठी काम पाहिलेला तरुण आणि टॅलेंटेड टेक्निशिनयन निमिश पिळनकर याचं हाय ब्लड प्रेशरमुळे ब्रेन हॅमरेज झाल्यानं निधन झालं. मागच्या काही दिवसांपासून तो एका वेब सीरिजसाठी काम करत होता. असं सांगितलं जातंय की मागचे काही दिवस तो दिवस-रात्र हे काम पूर्ण करण्यात बीझी होता. पण कामाचा अति ताण आल्यानं त्याची तब्येत अचानक बिघडली आणि मेंदूच्या नसा तुटल्यानं त्याचा मृत्यू झाला. निमेशने नुकत्याच रिलीज झालेल्या बायपास रोड या वेबसीरिजसाठी सुद्धा काम केलं होतं. निमेशच्या निधनाची बातमी त्यावेळी समोर आली जेव्हा प्रसिद्ध सिने दिग्दर्शक आणि पत्रकार खालिद मोहम्मद यांनी निमेशच्या मृत्यू बद्दल ट्वीट केलं. सुत्रांच्या माहितीनुसार निमेशवर कामाचा प्रचंड ताण होता आणि कामाच्या या ताणामुळेच त्याचा ब्लड प्रेशर वाढला आणि ब्रेन हॅमरेज झाल्यानं त्याचा मृत्यू झाला. Bigg Boss 13 : हिंदुस्तानी भाऊच्या पत्नीनं घेतली पोलिसात धाव, जाणून घ्या कारण निमेश अवघ्या 29 वर्षांचा होता. खालिदनं त्याच्या ट्वीटमध्ये लिहिलं, ‘साउंड टेक्निशिनयन निमेश पिळनकरचा वयाच्या 29 व्या वर्षी मृत्यू. हे टेक्निशिनयनच सिनेमांचा ‘कणा’ असतात. मात्र त्यांची पर्वा कोणालाच नसते. सर्व संघटना स्टार्स आणि निर्मात्यांनी आता झोपेतून उठण्याची हीच वेळ आहे.’

जाहिरात

खालिदच्या या ट्वीटनंतर रेसुल पौकुट्टीनं रिप्लाय दिला आहे. ऑस्कर जिंकणाऱ्या रेसुलनं लिहिलं, धन्यवाद तुम्ही याबद्दल लिहिलं, प्रिय बॉलिवूड… खरं तर आम्हाला आणखी किती तडजोड कराव्या लागणार आहेत. याचं उत्तर बनून माझा मित्र हे जग सोडून निघून गेला.

कोणत्याही सिनेमाच्या रिलीजचा दबाव हा सर्वात जास्त पोस्ट प्रॉडक्शन टीमवर असतो. कोणत्याही सिनेमाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर तो लवकरात लवकर रिलिज व्हायला हवा असं प्रत्येक दिग्दर्शकाला वाटत असतं. त्यामुळे पोस्ट प्रॉडक्शन टीमला यावर दिवस-रात्र काम करावं लागतं. ज्यामुळे सिनेमा त्याच्या ठरलेल्या वेळेत रिलीज होईल. आता सापडली रानू मंडलची कार्बन कॉपी, सोशल मीडियावर गाण्याचा VIDEO VIRAL …आणि सिनेमाच्या सेटवरुन शाहरुख थेट पोहोचला तुरुंगात! =======================================================

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood
  • First Published :
जाहिरात
जाहिरात