मुंबई, 25 नोव्हेंबर : बॉलिवूड अभिनेता आणि अभिनेत्रींसारख्या हुबेहूब दिसणाऱ्या व्यक्ती सापडणं आता खूपच सामान्य बाब झाली आहे. आतापर्यंत श्रीदेवी, करिश्मा कपूर, अनुष्का शर्मा, मधुबाला आणि काजोल यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्ती सापडल्या आहेत. पण सध्या आलिया भट सारखी दिसणारी व्यक्ती सापडली असून ही व्यक्ती तरुणी नाही तर तरुण आहे. ज्याची सध्या आलिया भटचं मेल व्हर्जन म्हणून सोशल मीडियावर चर्चा होत आहे. आलिया भटचं मेल व्हर्जन म्हणून सोशल मीडियावर चर्चेत असलेला हा तरुण एक प्रसिद्ध यूट्यूबर आहे. भुवन बाम असं या तरुणाचं नाव आहे. भुवनचा एक फोटो झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर तो हुबेहूब आलिया भटसारखा दिसत असल्याचं म्हटलं आहे. भुवनचा हा फोटो Tell My Kids या ट्रेंडमुळे सोशल मीडियावर व्हायरल झाला. या ट्रेंडमध्ये भविष्यात युजर्स त्यांच्या मुलांना काय-काय सांगणार आहेत. याबद्दल बोलताना दिसले. या ट्रेंडवर एका युजरनं भुवनचा फोटो शेअर करत लिहिलं, मी माझ्या मुलांना सांगेन की दाढीवाली आलिया भट सुद्धा होती. जेव्हा भुवननं हे ट्वीट पाहिलं तेव्हा त्यानं लिहिलं, जेव्हा मी हा फोटो पहिल्यांदा पाहिला तेव्हा फोटोग्राफरला मी सुद्धा असंच सांगितलं होतं की, या फोटोमध्ये मी आलिया भटसारखा दिसत आहे.
इंग्लिशमध्ये बोलणाऱ्या तापसीला प्रेक्षकानं दिला हिंदी बोलण्याचा सल्ला आणि…
भुवननं पुन्हा एकदा त्याचा हा फोटो ट्विटरवर शेअर करत आलिया भटला कॉफी डेटसाठी विचारलं आहे. त्यानं लिहिलं, प्लिज आपण कॉफी डेटसाठी जायचं का? कारणं मी माझ्या क्रश सारखा दिसतो आहे. या ट्वीटमधून भुवननं आलिया भट त्याची क्रश असल्याचं मान्य केलं तसेच इतरांनाही फोटो रिट्विट करायला सांगितलं आहे.
Bigg Boss 13 : हिंदुस्तानी भाऊच्या पत्नीनं घेतली पोलिसात धाव, जाणून घ्या कारण
.@aliaa08 Please let’s go for a coffee date because I’ve started looking like my crush! pic.twitter.com/DFBDrEZM0v
— Bhuvan Bam (@Bhuvan_Bam) November 24, 2019
आलिया भट सध्या रणबीर कपूरला डेट करत आहे. त्यामुळे ती भुवनसोबत कॉफी डेटवर जायला तयार होते का किंवा त्याच्या ट्वीटला रिप्लाय देते की नाही याची सर्वांना उत्सुकता आहे.वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर लवकरच आलिया-रणबीरचा ब्रह्मास्त्र हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमत आलिया रणबीर पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. यात त्यांच्यासोबत मौनी रॉय आणि अमिताभ बच्चन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. आता सापडली रानू मंडलची कार्बन कॉपी, सोशल मीडियावर गाण्याचा VIDEO VIRAL ============================================================

)







