मुंबई, 07 नोव्हेंबर : सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रकाशझोतात आलेली सिंगर रानू मंडल मागच्या काही दिवसांपासून एका चाहतीवर रागवल्यानं चर्चेत आली आहे. पश्चिम बंगालच्या रानाघाट रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन भीक मागणाऱ्या रानू यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्या रातोरात स्टार झाल्या. एवढंच नाही तर बॉलिवूडचा स्टार प्लेबॅक सिंगर हिमेश रेशमियानंही त्यांना त्याच्या सिनेमात गाण्याची संधी देऊ केली. पण नुकताच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात रानू एका चाहतीवर भडकलेल्या दिसत आहेत. त्यामुळे स्टार झाल्यावर रानू मंडल यांचा सूरच बदलल्याचं म्हटलं जात आहे. हिमेश रेशमियाच्या हॅप्पी हार्डी अँड हीर या सिनेमातील ‘तेरी मेरी कहानी’ हे रानू यांचं गाणं प्रचंड गाजलं. लोकांनी त्यांना खूप प्रेम दिलं. रानू मंडल मीडिया समोर आल्या तेव्हा सर्वांशीच नम्रपणे बोलताना दिसल्या. मात्र काही दिवसांपूर्वी फेसबुकवर रानू मंडल यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये त्या एका सुपर मार्केटमध्ये काहीतरी खरेदी करताना दिसत आहेत. एवढ्यात एक महिला त्यांना हात लावून हाक मारते आणि त्याच्यासोबत सेल्फी घेण्याविषयी विचारते. मात्र यावर रानू तिच्यावर रागावतात. त्या आधी त्या महिलेला दूर राहायला सांगतात आणि नंतर हात लावून हे असं करण्याचा अर्थ काय असं विचारताना दिसत आहेत. चाहतीनं हात लावल्यानं रानू मंडल भडकल्याचं या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. ‘ती काळाच्या विळख्यातून सुटू शकेल का?’ पाहा Vicky Velingkar Teaser
#RanuMondal
— Archit Borde (@humdrum_ka_gum) November 5, 2019
Ranu Mondal to her fan : pic.twitter.com/lhV3h7w6Sj
यामुळे सध्या रानू यांच्यावर सगळीकडून टीका केली जात आहे. त्यांचं हे वागणं तसं पाहिलं तर कोणालाच आवडलेलं नाही. पण नेटकऱ्यांनी मात्र यावेळीही रानू यांच्यावर मीम्स बनवायची संधी सोडली नाही. सध्या रानू मंडल यांच्यावर तयार केलेले अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. VIDEO : ऐश्वर्या राय झाली सिंगर, आवाज ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!
When #RanuMondal lost her mind on a fan
— Harsh (@bitter_parker_) November 6, 2019
Le fan : pic.twitter.com/dNNchd6tQI
रानू मंडल यांच्यावर तयार करण्यात आलेल्या या मीम्समध्ये सर्वाधिक लोकांनी त्यांना मिळालेल्या यशाचा गर्व झाल्याचं अधोरेखित केलं आहे.
रानू मंडल यांच्या या वागण्यावर त्यांचे चाहते नाराज आहेत. त्यांचं हे वागणं पूर्णपणे चुकीचं असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. स्टार झाल्यावर त्यांच्या डोक्यात हवा गेलीय असाच सूर सोशल मीडियावर दिसून येत आहे. पण काही लोकांनी मात्र रानू मंडल यांना हात लावणाऱ्या महिलेलाही चुकीचं म्हटलं आहे. पण रानू यांचं वागण्यालाही कोणी समर्थन दिलेलं नाही. माधुरी ते जेनेलिया, बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रींनी मुलासाठी घेतला करिअरमधून ब्रेक ======================================================= अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नांगरे पाटलांनी घेतली बैठक, म्हणाले…

)







