बॉलिवूडमध्ये काही अशा आई आहेत ज्यांनी आपल्या मुलांसाठी आणि त्यांच्या संगोपनासाठी करिअरला बाय- बाय म्हटलं. तेही अशावेळी जेव्हा त्यांचं करिअर टॉपला होतं. जाणून घेऊ अशाच टॉप 5 सुपर मॉमबद्दल
काजोलने अजय देवगणशी 1999 मध्ये तेव्हा लग्न केलं जेहा ती करिअरच्या टॉपला होती. आज काजोल आणि अजयचे न्यासा आणि युग ही दोन मुलं आहेत. काजोलने आपलं करिअर सोडताना सांगितलं होतं की, तिला तिच्या आयुष्यात थोडी शांती आणि विराम हवा आहे.
श्रीदेवी- बॉलिवूडची पहिली स्त्री सुपरस्टार अशी ओळख असलेल्या श्रीदेवी यांनी करिअरच्या अशावेळी ब्रेक घेतला जेव्हा त्या टॉपच्या अभिनेत्री होत्या. त्यांनी आपल्या दोन्ही मुली जान्हवी आणि खुशीसाठी करिअर सोडलं. पण आज त्यांच्या दोन्ही मुलींमध्ये आईची स्टाइल आणि फॅशनची झलक दिसते.
जेनेलिया देशमुख- बॉलिवूडची सर्वात क्युट जोडी म्हणून रितेश आणि जेनेलिया देशमुखकडे पाहिलं जातं. 3 फेब्रुवारी 2012 रोजी दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर जेनेलियाने सिनेसृष्टीला अलविदा म्हटलं. इतर अभिनेत्रींप्रमाणे तिनेही करिअर चांगलं सुरू असताना मध्येच सोडून दिलं.
माधुरी दीक्षित- धक धक गर्ल माधुरी दीक्षितने अचानक डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं आणि सर्वांना धक्का दिला. लग्नानंतर माधुरी अमेरिकेत सेटल झाली. तिला रियान आणि एरिन ही दोन मुलं आहे. मुलं मोठी झाल्यानंतर माधुरीने बॉलिवूडमध्ये कमबॅक केलं. पण तोवर तिने आपला पूर्ण वेळ हा मुलांसाठीच दिला.