मुंबई, 07 नोव्हेंबर : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची मुख्य भूमिका असलेला ‘विक्की वेलिंगकर’ सिनेमा मागच्या काही काळापासून खूप चर्चेत आहे. काही दिवसापूर्वीच या सिनेमाचे पोस्टर्स रिलीज झाले. ज्यातील मास्क मॅनच्या पोस्टरनं प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली. त्यानंतर आता या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. अत्यंत गुढ आणि रहस्यमय अशा टीझरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे या टीझरमध्ये फक्त मास्क मॅन आणि सोनाली कुलकर्णी दिसत असल्यानं अभिनेत्री स्पृहा जोशीच्या भूमिकेबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘विक्की वेलिंगकर’च्या या टीझरमधून ‘मास्क मॅन’चा अधिक रुद्र आणि घाबरवणारा ‘चेहरा’ समोर येतो. सिनेमाची नायिका सोनाली कुलकर्णी गर्भगळीत अवस्थेत दिसत असल्यानं प्रेक्षकांमध्येही एक प्रकारची भीती निर्माण होते. ‘ती काळाच्या विळख्यातून सुटू शकेल का?’ हे पडद्यावर उमटणारे शब्द काहीतरी अघटीत तर घडणार नाही ना, अशी धास्ती निर्माण करून जातात. ‘लाईफ इज फुल ऑफ सरप्रायझेस’, असे वाक्य सोनालीच्या तोंडी आहे. तसेच या चित्रपटामध्येही अनेक रहस्य दडलेली असतील असा कयास प्रेक्षक बांधत आहेत. सध्या सोशल मिडियावर या टीझरची जोरदार चर्चा सुरु आहे. माधुरी ते जेनेलिया, बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रींनी मुलासाठी घेतला करिअरमधून ब्रेक
‘विक्की वेलिंगकर’ ही कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखा असून तो एक घड्याळ विक्रेता आहे. आयुष्यातील एका अनपेक्षित अशा गूढतेशी या व्यक्तिरेखेचा सामना होतो. या सिनेमाची नायिका ही या सर्व आव्हानांवर आणि अडचणींवर मात करत खंबीरपणे उभे राहते, तिची ही कथा आहे, ‘मिकी व्हायरस’ आणि ‘7 अवर्स टू गो’ अशा बॉलिवूड सिनेमाचं दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक सौरभ वर्मा यांनीच ‘विक्की वेलिंगकर’चं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाची निर्मिती जीसिम्स, लोकीज स्टुडीओ आणि डान्सिंग शिवा प्रॉडक्शन यांनी केली आहे. अथिया शेट्टीच्या वाढदिवसाला केएल राहुलनं दिल्या शुभेच्छा, Photo Viral सोनाली कुलकर्णी ही या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सोनाली कुलकर्णीने मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नटरंग, अजिंठा, झपाटलेला-2, क्लासमेट, मितवा, हंपी असे अनेक हिट सिनेमा तिनं दिले आहेत. याशिवाय स्पृहा जोशी, विनिता खरात, केतन सिंग, जुई पवार, गौरव मोरे, संग्राम समेळ आणि रमा जोशी यांच्याही या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘विक्की वेलिंगकर’ येत्या 6 डिसेंबर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दबंग सलमान खानला आजकाल सतावतेय ‘या’ गोष्टीची भीती ================================================== अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नांगरे पाटलांनी घेतली बैठक, म्हणाले…

)







