VIDEO : ऐश्वर्या राय झाली सिंगर, आवाज ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

VIDEO : ऐश्वर्या राय झाली सिंगर, आवाज ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

सध्या ऐश्वर्याचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ती गाणं गाताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 07 ऑक्टोबर : बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय मागच्या दोन दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. तिने विश्वसुंदरीचा मुकूट जिंकल्यावर बॉलिवूडमध्ये एंट्री केली. तेव्हापासून तिच्या सौंदर्यानं सर्वांना वेड लावलं होतं. पण सौंदर्यासोबतचं ऐश्वर्यानं स्वतःचं अभिनय कौशल्यही सिद्ध केलं. मात्र अभिनय आणि सौंदर्यासोबतच आणखी एक टॅलेंट ऐश्वर्याकडे आहे ज्याची माहिती फार कमी लोकांना आहे. ऐश्वर्या खूप छान गाणं सुद्ध गाते. सध्या ऐश्वर्याचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ती गाणं गाताना दिसत आहे. तिचा सुरेल आवाज ऐकून सर्वच हैराण झाले आहेत.

ऐश्वर्या राय-बच्चनचा हा व्हिडीओ सिंगर्सच्या एका फॅन पेजनं इन्स्टग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या 22 वर्षांपूर्वी रिलीज झालेला सिनेमा ‘और प्यार हो गया’मधील 'तेरी याद हमसफर सुबहो-शाम' हे गाणं गाताना दिसत आहे. या व्हिडीओ ऐश्वर्याच्या करिरच्या सुरुवातीच्या काळातला आहे. यात तिच्यासोबत तिचा सह अभिनेता चंद्रचूड सिंह सुद्धा दिसत आहे. ऐश्वर्या हे रोमँटिक साँग एवढं सुंदर गात आहे की, ते ऐकल्यावर तुम्हीही हैराण व्हाल. जेवढी सुंदर ती दिसत आहे त्याहून अनेक पटींनी सुरेल तिचा आवाज आहे.

अथिया शेट्टीच्या वाढदिवसाला केएल राहुलनं दिल्या शुभेच्छा, Photo Viral

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या पुन्हा पुन्हा आपण नर्व्हस असल्याचं बोलत आहे. तसेच तिनं चंद्रचूड सिंहला सुद्धा तिच्यासोबत गायला सांगितलं. या दोघांनी मिळू हे गाणं गायलं आहे. ऐश्वर्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून सर्वच ऐश्वर्याचं कौतुक करताना दिसत आहेत. 1997 मध्ये आलेला ‘और प्यार हो गया’ हा ऐश्वर्याचा पहिला सिनेमा होता. या सिनेमात तिनं बॉबी देओलसोबत स्क्रिन शेअर केली होती. या दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची खूप चांगली पसंती सुद्धा मिळाली होती.

दबंग सलमान खानला आजकाल सतावतेय 'या' गोष्टीची भीती

काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्यानं 46 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी ती पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्यासोबत दिसली. तिच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर सध्या तरी ती ब्रेकवर आहे. मात्र तिचा पती आणि अभिनेता अभिषेक बच्चन 'द बिग बुल' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

रणवीर सिंगला नागपूर पोलिसांच्या 'या' उत्तराने तुम्हीही माराल त्यांना कडक सॅल्युट

======================================================

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नांगरे पाटलांनी घेतली बैठक, म्हणाले...

First published: November 7, 2019, 11:23 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading