मुंबई, 16 एप्रिल : कोरोना व्हायरसनं सध्या सर्वांनाचं जगणं मुश्किल करून ठेवलं आहे. सध्या संपूर्ण जग या आजाराची लढत आहे. अशा अनेकांना आपल्या नोकऱ्या सोडून घरी बसावं लागलं. एवढंच नाही मनोरंजन क्षेत्रावरही या व्हायरसचा बराच परिणाम झाला आहे. रोजच्या पगारावर काम करणाऱ्याचा रोजगार सिनेमांचं शूटिंग थांबल्यानं बंद झाला आहे. एकीकडे सर्व सेलिब्रेटी वेगवेगळ्या संस्थांना दान करताना दिसत आहेत. गरजूंना अन्नदान करत आहेत. तर दुसरीकडे एका बॉलिवूड अभिनेता आपल्या स्टाफच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. काहीही झालं तरीही स्टाफचा पगार चुकवणार नाही पैसे नसतील तर कर्ज घेईन मात्र त्यांना सॅलरी देईन असं या अभिनेत्यानं म्हटलं आहे. तनु वेड्स मनु, अंग्रेजी मीडियम यासारख्या सिनेमातमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता दीपक डोबरियालनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ही घोषणा केली आहे. दीपक म्हणाला, मला खरंच हैराण आहे की जर आमच्या सारख्या लोकांना या व्हायरसमुळे एवढा त्रास होत आहे. तर मग गरीब किंवा जे लोक त्यांच्या सॅलरीवर अवलंबून आहेत अशांसाठी हा किती कठिण काळ आहे. माझ्यासाठी एकूण 6-7 लोक काम करतात. प्रत्येकाचं काम वेगवेगळं आहे. मी माझ्या स्टाफला वचन दिलं आहे की, हे सर्व संपेपर्यंत मी त्यांना त्यांची सॅलरी देत राहणार आहे. भले मग त्याच्यासाठी माझ्यावर कर्ज काढण्याची वेळ आली तरी चालेल. कोणत्याही प्रकारे मी त्यांची काळजी घेणार आहे. लारा दत्तानं पती महेश भूपतीची अनेक वर्षांची मेहनत घालवली होती ‘पाण्यात’
दीपक पुढे म्हणाला, जेवढं दुसरे अभिनेता करत आहेत तेवढं तर नाही करू शकत नाही. पण मला शक्य आहे ती प्रत्येक गोष्ट मी त्यांच्यासाठी करणार आहे. मी त्यांना सांगितलं आहे मी एक वर्षात एकच सिनेमा करतो. माझी कुवत एवढीच आहे. माझ्याकडे त्यांना देण्यासाठी खूप पैसे नाहीत पण त्यांची सॅलरी मात्र मी चुकवणार नाही. ‘जबन छोरी’मध्ये दिसला सपना चौधरीचा BOLD अंदाज, तुफान फिरतोय VIDEO
सध्या दीपक डोबरीयाल उत्तराखंडमध्ये त्याच्या कुटुंबासोबत फसला आहे. तो मनोज वाजपेयीसोबत एका सिनेमाचं शूटिंग करत होता. सध्या हे दोन्ही अभिनेते नैनीतालच्या एका गेस्ट हाऊसमध्ये थांबले आहेत. दीपक त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिथले फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा अंग्रेजी मीडियम हा सिनेमा रिलीज झाला ज्यातील त्याच्या कामाचं बरंच कौतुक झालं. (संपादन : मेघा जेठे.) शिल्पा शेट्टीचं ‘15’ या अंकाशी आहे खास कनेक्शन, Video शेअर करुन सांगितलं सिक्रेट