मुंबई, 16 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगच ठप्प झालं आहे. या व्हायरसचा वाढतं संक्रमण आणि धोका पाहत भारत सरकारनं लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवलं आहे. त्यामुळे सध्या सर्वच बॉलिवूड स्टार त्यांच्या सिनेमांचं शूटिंग थांबवून घरी बसले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यामातून सर्वजण त्यांच्या चाहत्यांमध्ये या व्हायरसबाबत जनजागृती करण्याचं काम करत आहेत. पण अशात अभिनेता सलमान खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात तो पोलीस आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या लोकांवर भडकलेला पाहायला मिळत आहे.
सलमान खाननं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात त्यानं कोरोना आपल्या जीवनाचा बिग बॉस म्हणत सर्वांना घरी राहण्याचं आवाहन केलं आहे. या व्हिडीओमध्ये सलमाननं म्हटलं, जेव्हा कोरोना आला त्यावेळी वाटलं होतं एखादा नॉर्मल फ्ल्यू असेल. काही काळानंतर ठीक होईल. पण लॉकडाऊन केल्यानंतर लक्षात आलं की हे प्रकरण खूप गंभीर आहे. या कोरोनानं सर्वांनाच घरी बसवलं आहे. पण अद्याप काही लोक आहेत ज्यांना या व्हायरसचं गांभीर्य समजलेलं नाही.
वेळ पडल्यास कर्ज काढेन पण स्टाफला पगार देईन, बॉलिवूड अभिनेत्याची घोषणा
View this post on Instagram
सलमान पुढे म्हणाला, ज्या आजाराचं काही औषध नाही त्याचा पॉझिटीव्ह पेशंट होणं खूपच दुःखद आहे. जे लोक याचं गांभीर्य समजत नाहीत आहेत. ते खरंच अँटी ह्यूमनचं काम करत आहेत. एक पॉझिटीव्ह व्यक्ती सध्या विचार करत असेल की माझ्याकडून चूक झाली आहे. पण अद्याप जे लोक काळजी घेत नाही आहेत. ते मात्र खात्रीशीर स्वतः कोरोना पॉझिटीव्ह तर होतीलच पण यासोबतच आपल्या पूर्ण कुटुंबाला या व्हायरचं आजारपण देणार आहेत.
'आग लावण्याचं राजकारण खेळला नाहीस', अभिनेत्याची मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने
दबंग खाननं या व्हिडीओमध्ये सर्वांना सरकारच्या सूचनांचं पालन करायला सांगितलं आहे. सलमान सांगतो, तुम्हाला नमाज किंवा पूजा करायची आहे. ते सर्व घरात राहून करा. पोलिस आणि सरकार तुमच्या भल्यासाठीच काम करत आहेत. त्यांचा यात काही वैयक्तीक स्वार्थ आजिबात नाही आहे. आतापर्यंत तुम्ही त्यांचं ऐकलं असतं तर कदाचित आपण सर्व मिळून या आजारावर मात करु शकलो असतो आणि लॉकडाऊन संपलं सुद्धा असतं.
सीधी बात, नो बकवास. Respect for Salman Khan. Speaks straight from the heart. Hope this plain and simple message reaches the right audience and helps everyone around. pic.twitter.com/lMRq5piuJ5
— Arun Bothra (@arunbothra) April 16, 2020
सलमान या व्हिडीओमध्ये पुढे म्हणाला, पोलीस आणि वैद्यकीय कर्मचारी तुमच्याासाठी काम करत आहेत. त्यांचा त्यात कोणताही स्वार्थ नाही. कदाचित यामुळे त्यांना कोरोना होऊ शकतो. त्यांची कुटुंब सुद्धा सध्या धोक्यात आहेत. ते त्यांची ड्यूटी पूर्ण करत आहेत आणि तुमची ड्यूटी घरी राहण्याची आहे. पण तुम्ही तेवढी सुद्धा पूर्ण करु शकत नाही आहात. उलट तुम्ही त्यांच्यावर हल्ले करता हे चुकीचं आहे. हा रोग जात-पात आणि धर्म बघून येत नाही. त्यामुळे बाहेर पडून तुम्ही विनाकारण त्यांचं जीवन संकटात टाकत आहात.
View this post on Instagram
सलमान अखेर म्हणाला, काही जोकरांमुळे हा आजारा आपल्या देशात वेगानं पसरत आहे. जर आपण वेळीच सरकारच्या नियमाचं पालन केलं असतं तर कदाचित आज परिस्थिती वेगळी असली असती. काही अतिशाहाण्या लोकांमुळे आता पूर्ण देशाला त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. एक र आपण सर्वजण राहू नाहीतर कोणीच राहणार नाही. आपण डॉक्टर,नर्स, पोलीस या सर्वांचे आभार मानायला हवे. त्यांच्यावर हल्ले करण्याचे हे प्रकार थांबायला हवे.
(संपादन : मेघा जेठे.)
दारू प्यायल्यानं कोरोना मरतो का? कार्तिकच्या प्रश्नावर काय म्हणाल्या डॉक्टर
'जबन छोरी'मध्ये दिसला सपना चौधरीचा BOLD अंदाज, तुफान फिरतोय VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Coronavirus, Salman khan