मुंबई, 18 ऑक्टोबर : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचा हा पहिला करवा चौथ. प्रियांकानं मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये अमेरिकन सिंगर निक जोनासशी लग्न केलं. उमेद भवनमधील प्रियांका चोप्राचं लग्न रॉयल अंदाजामुळे खूप चर्चेत राहिलं. प्रियांका हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीनं विवाह बंधनात अडकली. परदेशावासी झाल्यानंतरही तिनं आपल्या हिंदू परंपरा जपल्या आहेत. एवढंच नाही तर पती निकला सुद्धा अनेक रुढी परंपरा याविषयी माहिती देत असते. नुकतंच करवा चौथच्या निमित्तानं सोशल मीडियावरील निकची पोस्टमध्ये याची झलक दिसली. प्रियांकाचा पहिला करवा चौथ म्हटल्यावर निक तरी सेलिब्रेशन आणि प्रियांकाचं कौतुक करण्यात मागे कसा राहिल. त्यानं प्रियांकासोबतचे ट्रेडिशनल कपड्यातील फोटो शेअर करत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली. त्यानं लिहिलं, ‘माझी पत्नी भारतीय आहे आणि ती हिंदू आहे. ती प्रत्येक गोष्टीत बेस्ट आहे. तिनं तिची संस्कृती आणि धर्माविषयी मला अनेक गोष्टी शिकवल्या. मी तिच्यावर खूप प्रेम करतो आणि तुम्ही पाहू शकता आम्ही दोघं एकमेकांसोबत खूप एंजॉय करतो. करवा चौथच्या सर्वांना खूप शुभेच्छा!’ KBC 11 : 7 कोटींसाठी विचारला गांधीजी आणि फुटबॉलबद्दल प्रश्न, उत्तर माहित आहे का?
निकची ही इन्स्टाग्राम पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या पोस्टवर युजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. एका युजरनं लिहिलं, ‘निक जोनस सबसे महान पती’ याशिवाय अनेक भारतीय चाहत्यांनी निकनं भारतीय संस्कृतीचा आदर केल्यानं त्याचं कौतुक केलं आहे. निक जोनस आणि प्रियांका यांच्यात खूप चांगलं बॉन्डिंग आहे आणि अनेकदा त्यांच्याबद्दल वर्तमानपत्र आणि मासिकांमध्ये उलट सुलट छापून आल्यानंतरही हे दोघंही एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत.
बिग बी अमिताभ बच्चन रुग्णालयात, 3 दिवसांपासून सुरू आहेत उपचार
काही दिवसांपूर्वीच प्रियांकाचा ‘द स्काय इज पिंक’ हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमातून प्रियांकानं 3 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलं. तिचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर म्हणावा तसा चालला नसला तरीही समीक्षकांनी मात्र त्याचं भरभरुन कौतुक केलं. मोटिव्हेशनल स्पीकर आयशा चौधरी हिच्या जीवनावर आधारित असलेल्या या सिनेमात प्रियांकासोबत फरहान अख्तर, झायरा वसीम आणि रोहित सराफ यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
मुलाला ‘मोदी जी’ म्हणायला शिकवतेय अभिनेत्री, VIDEO पाहून पंतप्रधान म्हणाले…
=================================================== EXCLUSIVE VIDEO: काँग्रेस उमेदवाराच्या बाऊन्सरचं फोटोशूट वादात, पोलिसांच्या स्टेंनगण घेऊन दिल्या पोज