KBC 11 : गांधीजी आणि फुटबॉलबद्दल विचारला 7 कोटी रुपयांसाठीचा प्रश्न, उत्तर माहिती आहे का?

KBC 11 : गांधीजी आणि फुटबॉलबद्दल विचारला 7 कोटी रुपयांसाठीचा प्रश्न, उत्तर माहिती आहे का?

गांधीजींनी आंदोलन उभा करण्यासाठी फुटबॉल या खेळाचा वापर केला. याबद्दल कौन बनेगा करोडपतीमध्ये 7 कोटी रुपयांसाठी प्रश्न विचारण्यात आला होता.

  • Share this:

मुंबई, 18 ऑक्टोबर : 'कौन बनेगा करोडपती'मध्ये 11 व्या हंगामाचे तिसरे करोडपती गौतम झा ठरले. बिहारच्या गौतम कुमार झा यांनी एक कोटीची रक्कम जिंकली. खरं तर 50 लाखाच्या प्रश्नावर गौतम यांनी सर्व लाइफ लाइन वापरल्या होत्या. लाइफ लाइन शिल्लक नसताना धोका पत्करून त्यांनी 1 कोटीच्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं. ते करोडपती झाले पण 7 कोटींच्या प्रश्नासाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर मात्र त्यांना देता आलं नाही.

राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि फुटबॉल याबद्दल कौन बनेगा करोडपतीमध्ये 7 कोटी रुपयांसाठी प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर गांधीजी आणि खेळ यांचंही नातं असल्याचं लोकांना समजलं. खरतंर गांधीजींनाही खेळात फारसा रस नव्हता. खेळातही त्यांनी तोपर्यंत भाग घेतला नाही पण जेव्हा खेळ शाळेत बंधनकारक झाला तेव्हा मात्र नाईलाजानं सहभागी झाले. त्यानंतर क्रिकेट, अॅथलेटिक्स मध्ये भाग घेतला.

राजकोटमधील राजकुमार कॉलेजमध्ये असताना महात्मा गांधी फुटबॉल खेळले. त्यानंतर गांधीजी 1893 ते 1915 या काळात दक्षिण आफ्रिकेत होते. तेव्हा डर्बन, प्रिटोरिया आणि जोहान्सबर्ग इथं त्यांनी तीन फुटबॉल क्लब स्थापन केले. त्या तीनही फुटबॉल क्लबचे नाव पॅसिव्ह रजिस्टर्स सॉकर क्लब असं ठेवण्यात आलं होतं. यावरच 7 कोटी रुपयांचा प्रश्न विचारण्यात आला होता.

फुटबॉलच्या माध्यमातूनही त्यांनी आंदोलन उभा केलं होतं. सामन्यावेळी पॅम्प्लेट वाटून लोकांना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं. गांधीजींनी कृष्णवर्णीयांसाठी समान अधिकार मिळवून दिले. फुटबॉल टीमला आणि हाफ टाइममध्येलोकांना भाषण देऊन प्रेरणा देत असत.

7 कोटी रुपयांसाठीचा प्रश्न

डर्बन, प्रिटोरिया आणि जोहान्सबर्ग इथं 20 व्या शतकाच्या सुरुवातीला महात्मा गांधींच्या मदतीने स्थापन करण्यात आलेल्या तीन फुटबॉल क्लबचे नाव काय होते?

उत्तर : पॅसिव्ह रजिस्टर्स

1 कोटी रुपयांसाठीचा प्रश्न

भारतात तयार करण्यात आलेल्या कोणत्या जहाजावर फ्रान्सिस स्कॉट की याने डिफेन्स ऑफ फोर्ट मॅकहेन्री ही अमेरिकेचं राष्ट्रगित असलेली कविती लिहली.

उत्तर : एचएमएस मिंडेन

VIDEO: पवारांच्या वयावरून मुख्यमंत्र्यांची घणाघाती टीका, दिलं 'शोले'चं उदाहरण

First published: October 18, 2019, 9:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading