जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘वयाच्या 15 व्या वर्षी 8 लोकांनी माझ्यावर बलात्कार केला’, KBC स्पर्धकाचा धक्कादायक खुलासा

‘वयाच्या 15 व्या वर्षी 8 लोकांनी माझ्यावर बलात्कार केला’, KBC स्पर्धकाचा धक्कादायक खुलासा

‘वयाच्या 15 व्या वर्षी 8 लोकांनी माझ्यावर बलात्कार केला’, KBC स्पर्धकाचा धक्कादायक खुलासा

KBCच्या कर्मवीर स्पेशल एपिसोडमध्ये आलेल्या स्पर्धकानं आयुष्यातील अशा धक्कादायक घटनांचा खुलासा केला. त्यामुळे अमिताभ बच्चन सुद्धा हैराण झाले.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 ऑक्टोबर : अमिताभ बच्चन यांचा क्विज शो ‘कौन बनेगा करोडपती’चा  11 वा सीझन सध्या टीआरपी लिस्टमध्ये टॉपवर जाऊन पोहोचला आहे. मागच्या काही दिवसांपासून या शोची लोकप्रियता खूप वाढत आहे. यामागचं खास कारण म्हणजे या शोमध्ये पोहोचणारे स्पर्धक नुकतंच केबीसी 11 मध्ये बिहारचे स्पर्धक गौतम झा यांनी 1 कोटी जिंकले. त्यानंतर या शोच्या कर्मवीर स्पेशल एपिसोडमध्ये आलेल्या सुनिता कृष्णन सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत. या एपिसोडमध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अशा धक्कादायक घटनांचा खुलासा या एपिसोडमध्ये केला आहे की त्यामुळे खुद्द अमिताभ बच्चन सुद्धा हैराण झाले. सोनी टीव्हीनं त्यांच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाउंटवर केबीसी 11 मध्ये आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सुनिता कृष्णन यांचे 2 प्रोमो शेअर केले आहेत. ज्यात सुनिता त्यांच्या जीवनातील अनेक धक्कादायक घटनांचा खुलासा करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये त्या सांगतात, ‘मी जेव्हा 15 वर्षांची होते त्यावेळी माझ्यावर 8 लोकांनी बलात्कार केला होता.’ हे ऐकल्यावर तिथल्या प्रेक्षकांसोबतच अमिताभ बच्चन यांनाही धक्का बसलेला दिसतो. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये त्यांनी चाइल्ड ट्राफिकिंग आणि वेश्यावृत्तीमध्ये फसलेल्या महिलांना वाचवताना आलेले अनुभव शेअर केले आहेत. KBC 11 : 7 कोटींसाठी विचारला गांधीजी आणि फुटबॉलबद्दल प्रश्न, उत्तर माहित आहे का?

जाहिरात

अमिताभ यांनी या व्हिडीओमध्ये सांगितलं, ‘सुनिता यांनी आतापर्यंत 22 हजार पेक्षा जास्त महिला आणि मुलीची रेस्क्यू ऑपरेशन केली आहेत.’ सुनिता सांगतात, मी एका साडेतीन वर्षाच्या मुलीला वेश्यालयातून बाहेर काढलं आहे. माझ्यावर आतापर्यंत 17 वेळा हल्ले झाले आहेत. पण मला मरणाची भीती वाटत नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी या मुलींचं रक्षण करत राहणार. मी एका साडेतीन वर्षाच्या मुलीला वेश्यालयातून बाहेर काढलं आहे.’ बिग बी अमिताभ बच्चन रुग्णालयात, 3 दिवसांपासून सुरू आहेत उपचार

सुनिता या प्रज्जवला या NGO च्या मुख्य अधिकारी आणि सह-संस्थापिका आहेत. हा एनजीओ यौन तस्करीची शिकार झालेल्या महिला आणि मुलींना वाचवून त्यांचं पुनर्वसन करण्याचं काम करतात. कर्मवीर सुनिता कृष्णन यांना त्यांच्या या कामासाठी 2016 मध्ये देशातील चौथा सर्वोत्तम नागरी पुरस्कार ‘पद्मश्री’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या जीवनाची कथा खरंच खूप प्रेरणादायी आहे. हे काम करत असताना अनेकदा त्यांचा अपमान केला गेला, अनेकदा त्याना जीवे मारण्याचाही प्रयत्न झाला मात्र त्यांनी हार न मानता आपलं काम सुरूच ठेवलं. मुलाला ‘मोदी जी’ म्हणायला शिकवतेय अभिनेत्री, VIDEO पाहून पंतप्रधान म्हणाले… =========================================================== EXCLUSIVE VIDEO: काँग्रेस उमेदवाराच्या बाऊन्सरचं फोटोशूट वादात, पोलिसांच्या स्टेंनगण घेऊन दिल्या पोज

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात