मुंबई, 06 नोव्हेंबर : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. एका 4 वर्षीय मुलाला अपशब्द वापरल्यानं स्वराला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. नुकतच स्वरानं ‘सन ऑफ एबिश’ चॅट शोमध्ये हजेरी लावली. या शोमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे स्वराला आता सोशल मीडियावर ट्रोल केल जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका बालकलाकाराबद्दल बोलताना दिसत आहे. या मुलाबद्दल बोलताना स्वरानं अपशब्द वापरल्याचं दिसत आहे. हा किस्सा स्वराच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातला आहे. त्यावेळी ती जाहीरातींसाठी काम करत असे. यावेळी अशाच एका जाहीरातीच्या शूटिंगच्या वेळी स्वराला एका 4 वर्षाच्या लहान मुलानं आंटी म्हटलं होतं. ज्यामुळे तिला त्याचा खूप राग आला होता. न्यूड फोटो व्हायरल झाल्यानंतर ‘या’ पॉप सिंगरने सोडलं ग्लॅमरस करियर
या व्हिडीओ क्लिपमध्ये स्वरा शो होस्टसोबत आपल्या शूटिंगच्या काळातील एक घटनेची आठवण सांगताना म्हणाली, एकदा मी शूटिंगच्या दरम्यान खूपच निराश झाले होते. कारण मला एका लहान मुलानं मला आंटी म्हटलं होतं त्यावेळी माझ्या करिअरचा अगदी सुरुवातीचा काळ होता. ‘बेबी को तो कॉफी पसंद है’, सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनुष्का ट्रोल स्वरा म्हणाली, मी त्या मुलाला तिच्या तोंडावर काहीच बोलले नाही मात्र मला त्याचा खूप राग आला. तो मुलगा खरंच खूप दुष्ट होता. पण स्वराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. याशिवाय #SwaraAunty हा हॅशटॅग सुद्धा ट्विटरवर ट्रेंड झाला होता. Panipat trailer पाहिल्यावर अर्जुन कपूरवर भडकले नेटकरी, म्हणाले… ============================================================= पश्चिम रेल्वेवर दाखल झालेल्या नव्या लोकलचा पहिला लूक, पाहा VIDEO

)







