जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘बेबी को तो कॉफी पसंद है’, सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनुष्का ट्रोल

‘बेबी को तो कॉफी पसंद है’, सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनुष्का ट्रोल

‘बेबी को तो कॉफी पसंद है’, सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनुष्का ट्रोल

नेटकऱ्यांनी अनुष्काच्या काही दिवसांपूर्वीच्या सोशल मीडिया पोस्टचा आधार घेत ट्रोल केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 05 नोव्हेंबर : सध्या अभिनेत्री अनुष्का शर्मा पती विराट कोहलीसोबत भूटानमध्ये आहे. याठिकाणी भारताचा कर्णधार विराट कोहली त्याचा 31 वा जन्मदिन साजरा करत आहे. दरम्यान अनुष्कानं या ठिकाणचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत मात्र या फोटोंमुळे तिला सध्या ट्रोल केलं जात आहे आणि यामागच कारण आहे अनुष्कानं काही दिवसांपूर्वी केलेली पोस्ट. त्याचं झालं असं की, भारतीय क्रिकेट संघाचे माजी विकेटकीपर फारूख इंजिनिअर यांनी वर्ल्ड कपमध्ये भारतीय निवड समितीवर गंभीर आरोप केले होते. फारूख यांनी सिलेक्टर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माला सेवा देत चहा देण्यात व्यस्त होते, असा गंभीर आरोप केला होता. दरम्यान अनुष्कानं ट्विटरवरून त्यांचा खरपूस समाचार घेतला होता.

जाहिरात

अनुष्कानं आपल्या ट्वीटमध्ये सतत लोक खोट्याला खरे मानतात असे सांगितले. त्यावर टीकाकारांची शाळा घेत, “मी माझ्या करिअरमध्ये अनेक वादांवर शांत राहिले आहे. मात्र माझ्यावर निवड समितीन माझी सेवा केली, मला चहा दिला, असा आरोप करण्यात आला. पण मी वर्ल्ड कपमध्ये फॅमिली बॉक्समध्ये होते. तुम्हाला जर निवड समितीवर टीका करायची आहे, तर माझं नाव घेऊ नका. आणि मुळात मला चहा आवडत नाही मी कॉफी पिते”, असे म्हणत टीकाकारांनी सडेतोड उत्तर दिलं होतं. ‘इतिहासाच्या नावाखाली सॉफ्ट पॉर्नची निर्मिती’, करण जोहरवर कंगनाच्या बहिणीचा आरोप

त्यानंतर आता नुकतेच अनुष्कानं त्यांचा भूटान ट्रेकचे काही फोटो शेअर केले आणि त्या फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं भूटानमधील एका फॅमिलीचा उल्लेख केला. या फॅमिलीनं विराट-अनुष्का कोण आहोत हे माहित नसताना त्यांचं आदरातिथ्य कसं केलं याचं वर्णन केलं आहे. पण यामध्ये तिनं या कुटुंबानं त्यांना चहा दिल्याचं म्हटलं आहे. हाच मुद्दा पकडत आता अनुष्काला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. मराठ्यांच्या इतिहासातील आणखी एक सोनेरी पान उलगडणार, पाहा Panipat Trailer नेटकऱ्यांनी अनुष्काच्या काही दिवसांपूर्वीच्या सोशल मीडिया पोस्टचा आधार घेत, ‘बेबी को तो कॉफी पसंद है’ अशा शब्दात तिला ट्रोल केलं आहे. दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, मागच्या पोस्टमध्ये तर म्हटलं होतं की तुम्ही चहा नाही तर कॉफी पिता आणि तेही फॉर द रेकॉर्ड’ सध्या अनुष्का भूटानमध्ये पती विराट कोहलीसोबत सुट्टी साजरी करत आहे. भूटानमध्ये फिरत असताना तिथल्या गावात काही वेळ घालवला. तेव्हा एका कुटुंबाने केलेल्या पाहुणचाराने दोघेही भारावून गेले. त्याचा अनुभव अनुष्काने सोशल मीडियावर शेअर केला आहे. याशिवाय तिनं विराट कोहलीला त्याच्या 31 व्या वाढदिलवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. स्टार होताच बदलला रानू मंडलचा ‘सूर’, हात लावल्यानं चाहतीवर भडकली; पाहा VIDEO ======================================================================== VIDEO : ‘पानिपत’ सिनेमातील कलाकारचे लुक व्हायरल

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात