पाकिस्तानची पॉप सिंगर रबी पीरजादा ही कायम चर्चेत आणि वादात असते. कधी वेगवेगळी वक्तव्य तर कधी वादग्रस्त ट्विट यामुळे कायम ती चर्चेत असते.
रबीचे काही न्यूड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याशी वाद झाल्यानंतर हे व्हिडीओ व्हायरल झालेत अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर असीफ गफूर यांच्याशीही तिचं ट्विटरवरून भांडण झालं होतं. त्यानंतर तिचे हे व्हिडीओ व्हायरल झालेत आहेत. त्यामुळे यामागे नेमकं कोण आहे हे स्पष्ट होतं असंही अशी प्रतिक्रिया अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केली होती.
या सगळ्या प्रकरणानंतर तीने ट्विटरवरून आपण हे क्षेत्रच सोडत असल्याचं म्हटलं आहे. मी जे आत्तापर्यंत केलं त्यामुळे कुणी दुखावलं असेल तर मला माफ करा असं सांगत तिने अल्लाहचीही माफी मागते असंही म्हटलंय.
रबी ही पाकिस्तानची पॉप सिंगर असून तिची अनेक गाणी पाकिस्तानात तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत. काही दिवसांपूर्वी अजगरासोबत तिच्या गाण्याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. तर केवळ फक्त प्रसिद्धी मिळविण्यासाठी रबी असे स्टंट करते असाही आरोप केला जातोय.