10 वर्षांच्या मुलाचं ढोलकीवर रॅप साँग, व्हिडीओ पाहून हनी सिंगही झाला हैराण

रानु मंडलनंतर आता आणखीही एक ट्रेनमधल्या रॅपरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

News18 Lokmat | Updated On: Sep 29, 2019 07:16 PM IST

10 वर्षांच्या मुलाचं ढोलकीवर रॅप साँग, व्हिडीओ पाहून हनी सिंगही झाला हैराण

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे रातोरात स्टार झालेल्या रानू मंडल आता प्लेबॅक सिंगर झाल्या आहेत. त्यानंतर आता सोशल मीडियावर रोजच्या रोज कोणते ना कोणते गाण्याचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता अशाच एका ट्रेनमध्ये गाणं गाऊन पैसे कमवणाऱ्या मुलाचा देसी रॅपचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हा 10 वर्षांचा मुलगा यो यो हनी सिंग आणि बादशाह यांना टक्कर देत देसी रॅप करत आहे. या व्हिडिओमध्ये आपल्या ढोलकीसह हा मुलगा रॅप गात आहे. इंटरनेटववर हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. हा मुलगा हुबेहुब हनी सिंग आणि बादशाह सारखा रॅप करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हनी सिंगचाही विसर पडेल.

मुख्य म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या मुलाचा व्हिडिओ स्वता: हनी सिंगनं आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. यावर हनी सिंगनं या मुलाचे कौतुक करत मी पण फॅन झालो आहे असे पोस्ट केले आहे.

वाचा-रानू मंडलनी उदित नारायण यांच्यासोबत रेकॉर्ड केलं नवं गाणं, पाहा EXCLUSIVE VIDEO

Loading...

वाचा-EXCLUSIVE: Bigg Boss 13च्या स्पर्धकांची यादी झाली लीक, पाहा कोण कोण होणार सहभागी

काही काळ संगीत क्षेत्रापासून लांब असलेल्या हनी सिंगचा जलवा आयफा अवॉर्ड्स 2019मध्ये 2019 (IIFA Awards 2019) दिसून आला.

दरम्यान, ट्रेनमध्ये गाणाऱ्या या मुलाआधी काही रानु मंडल यांच्या गाण्याच्या चर्चा सगळीकडे होत्या. काही दिवसांपूर्वी रानु मंडल यांचे 'तेरी मेरी कहानी' हे गाणं रिलीज झालं असून याशिवाय त्यांनी प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर हिमेश रेशमियासोत 3 गाणी गायली आहेत. सध्या सोशल मीडियावर रानू मंडल यांच्या नावाचीच चलती आहे. स्टेशनवर गाणं गाऊन भीक मागणाऱ्या रानू मंडल यांचा बॉलिवूड प्लेबॅक सिंगर होण्यापर्यंतचा प्रवास खरंच थक्क करणारा असाच होता.

वाचा-सेक्रेड गेम्सची अभिनेत्री आहे प्रेग्नन्ट, Water Birth द्वारे बाळाला देणार जन्म

VIDEO: राष्ट्रावादीसोबत फॉर्म्युला ठरला; मित्रपक्षांसोबत अजूनही सस्पेन्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 29, 2019 06:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...