जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / शाहरुखची लेक करतेय हॉलिवूडमध्ये एंट्री, पहिल्या सिनेमाचा Teaser रिलीज

शाहरुखची लेक करतेय हॉलिवूडमध्ये एंट्री, पहिल्या सिनेमाचा Teaser रिलीज

शाहरुखची लेक करतेय हॉलिवूडमध्ये एंट्री, पहिल्या सिनेमाचा Teaser रिलीज

सुहानाचा पहिला सिनेमा ‘द ग्रे पार्ट ऑफ ब्लू (The Grey Part Of Blue)’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 29 सप्टेंबर : शाहरुख खानची मुलगी सुहाना खान ही सिनेसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. दररोज तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सुहानाचं फॅन फॉलोविंग कोणत्याही स्टारपेक्षा कमी नाही. सुहाना खान बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार हे जाणून घ्यायची साऱ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र आता ती हॉलिवूडमध्ये एंट्री करणार अशी चिन्ह दिसत आहे. काही दिवसांपूर्वी सुहाना एका शॉर्टफिल्मच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असल्याचं बोललं जात होतं आणि याचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सुहानाचा पहिला सिनेमा ‘द ग्रे पार्ट ऑफ ब्लू (The Grey Part Of Blue)’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुहानाच्या पहिला वहिला सिनेमा ‘द ग्रे पार्ट ऑफ ब्लू (The Grey Part Of Blue)‘चं पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज झालं होतं त्यानंतर आता तिच्या या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या टीझरमध्ये सुहाना खूपच इम्प्रेसिव्ह दिसत आहे. सुहानाच्या एका फॅनपेजवरुन हा टीझर शेअर करण्यात आला आहे. ‘द ग्रे पार्ट ऑफ ब्लू (The Grey Part Of Blue)’ ही एक शॉर्टफिल्म आहे. Paris Fashion Week मध्ये दिसला ऐश्वर्या रायच्या सौंदर्याचा जलवा, पाहा PHOTO

जाहिरात

सूत्रांच्या माहितीनुसार या शॉर्ट फिल्मचं दिग्दर्शन Theodore Gimeno नं केलं आहे. तर सुहानासोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या अभिनेत्याचं नाव ऑस्कर असं आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सुहाना म्हणाली, ‘द टेमपेस्ट’ या स्कुल ड्रामामध्ये तिनं पहिल्यांदा परफॉर्म केलं होतं. या ड्रामामध्ये मी मिरांडाची भूमिका साकरली होती.’  यावेळीच सुहानाच्या अभिनयाची पहिली झलक पाहायला मिळाली होती. EXCLUSIVE: Bigg Boss 13च्या स्पर्धकांची यादी झाली लीक, पाहा कोण कोण होणार सहभागी

जाहिरात

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा लघुपट सुहानाचे मित्र त्यांच्या कॉलेजमध्ये बनवत आहेत. हे जर खरं असेल तर सुहानाला सिनेमांत रुची असल्याचं स्पष्ट होतं. याचबरोबर येत्या काही वर्षांमध्ये ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल यातही काही शंका नाही. सुहाना युकेमध्ये थिएटर आणि सिनेमांचं शिक्षण घेत होती. गेल्या वर्षी शाहरुख मुलीचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी युकेमध्ये तिच्या कॉलेजमध्ये गेला होता. नुकतीच ती ग्रॅज्युएट झाली असून तिच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीला शाहरुख आणि गौरीनं हजेरी लावली होती. सेक्रेड गेम्सची अभिनेत्री आहे प्रेग्नन्ट, Water Birth द्वारे बाळाला देणार जन्म अभिनयात डेब्यू करण्याधीच सुहानानं दिग्दर्शनात एक वर्षापूर्वीच डेब्यू केला आहे. या आधी मॅग्झीन फोटोशूट चर्चेत राहिल्यांनंतर काही दिवसांपूर्वी सुहानाचे मालदीव व्हेकेशनचे फोटोही व्हायरल झाले होते. आपल्या बाबांप्रमाणे सुहाना फार ग्लॅमरस आयुष्य जगते. तिचे अनेक ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर ट्रेण्ड होत असतात. ========================================================== Navratri 2019: कोल्हापुराच्या अंबाबाईचं पहिलं दर्शन, पाहा LIVE VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात