...म्हणून साउथ अभिनेता विजयनं 400 लोकांना वाटल्या सोन्याच्या अंगठ्या

...म्हणून साउथ अभिनेता विजयनं 400 लोकांना वाटल्या सोन्याच्या अंगठ्या

साउथ सुपरस्टार विजय थालापथि यानं त्याच्या बिगिल (Bigil) सिनेमाच्या शूटिंगनंतर हा अजब कारनामा केला.

  • Share this:

मुंबई, 16 ऑगस्ट : कोणताही अभिनेता किंवा अभिनेत्रीसाठी त्यांच्या सिनेमाचं शूटिंग एखाद्या प्रवासासारखं असतं. प्रवासातल्या अनेक आठवणी नेहमीच त्यांच्या सोबत राहतात. नुकतंच एका अभिनेत्यानं या आठवणींना आणखी खास बनवण्यासाठी एक अजब काम केलं. त्याचा हा कारनामा सर्वत्र पसरला. साउथमधील या सुपरस्टारनं त्याच्या सिनेमाच्या शूटिंगनंतर सेटवरील सर्वांना महागड्या अंगठ्या वाटल्या. या अंगठ्या साध्या-सुध्या नाही तर सोन्याच्या आहेत. असं म्हटलं जातंय की संपूर्ण टीमला देण्यासाठी या अभिनेत्यानं तब्बल 400 अंगठ्या खरेदी केल्या. त्यानं दिलेल्या या खास अंगठ्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

साउथ सुपरस्टार विजय थालापथि यानं त्याच्या बिगिल (Bigil) सिनेमाच्या शूटिंगनंतर हा अजब कारनामा केला. मागच्या बऱ्याच दिवसांपासून तो या सिनेमाचं शूट करत होता. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं आणि आता या सिनेमाच्या रिलीजची तयारी सुरू आहे. पण विजयनं या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झाल्याच्या आनंदात 400 लोकांच्या टीमला खास भेटवस्तू दिली. विजयनं संपूर्ण टीमला 400 सोन्याच्या अंगठ्या भेट म्हणून दिल्या. या अंगठ्यांवर सिनेमाचं नावंही लिहिलेलं आहे.

उघडपणे Porn पाहतात ‘हे’ लोक, अभिनेत्री रिचा चढ्ढाचा खळबळजनक दावा

बिगिल सिनेमाच्या टीम मेंबर्सनी या अंगठ्यांसोबतचे फोटो त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत विजयचे आभार मानले. या सिनेमाची क्रिएटीव्ह प्रोड्यूसर अर्चनानं याविषयीचं ट्वीट केलं, ‘या सिनेमाच्या शूटिंसाठी 400 लोकांनी खूप मेहनत घेतली आहे आणि त्यांच्या या मेहनतीला विजयनं आणखीच खास बनवलं आहे.’ असं तिनं तिच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

राज की बात चिठ्ठीतून समोर! करीनासोबत लग्नाच्या दिवशीच सैफनं अमृताला लिहीलं पत्र

अभिनेता विजय थालापथि याची प्रमुख भूमिका असलेला ‘बिगिल’ हा सिनेमा एक स्पोर्ट्स ड्रामा आहे. या सिनेमाची खास गोष्ट अशी आहे की या सिनेमात विजयचा डबल रोल आहे. हा एक अ‍ॅक्शन आणि थ्रिलर ड्रामा असून यात विजय सोबत साउथ अभिनेत्री नयनतारा दिसणार आहे. तर बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ सुद्धा या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा 27 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.

अनुष्का शेट्टीसोबतच्या नात्याबद्दल प्रभास म्हणतो, आम्ही दोघंही...

=======================================================================

पुरामध्ये काढत होता सेल्फी, पाणी वाढले अन्...पाहा हा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 16, 2019 03:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading