मुंबई, 16 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चढ्ढा नेहमीच तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. याच कारणानं ती अनेकदा चर्चेतही असते. काही दिवसापूर्वी महाराष्ट्रात आलेल्या पूरानंतर सरकारवर टीका करत स्वतःला एक लाचार नागरिक म्हटलं होतं. एवढंच नाही तर नुकतंच सेक्स एज्युकेशनच्या बाबतीतही ऋचानं आपली प्रतिक्रिया दिली आहे. आगामी सिनेमा ‘सेक्शन 375’च्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी ऋचानं सेक्स एज्युकेशन आणि लैंगिक शोषण यावर बोलताना सेक्स एज्युकेशन सध्या अत्यंत गरजेच असल्याचं म्हटलं आहे. डेटा फ्री झाल्यानंतर पॉर्न पाहतात टीनेजर्स ऋचा म्हणाली, जेव्हा पासून मोबाइल डेटा फ्री झाला आहे तेव्हापासून तरुण मुलं-मुली सर्रास पॉर्न फिल्म पाहत असल्याचं दिसून येत आहे. याशिवाय क्राइम सुद्धा वाढले आहेत. अशी बरीचशी प्रकरणं आहेत ज्यात अल्पवयीन मुलांनी गँग रेप करून त्या मुलींचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करतात. ‘ये रे ये रे पैसा 2’ या मराठी सिनेमाला थिएटर्स मिळत नसल्यानं प्रसाद ओक संतापला
गँग रेपचा व्हिडिओ बनवतात अल्पवयीन मुलं ऋचा पुढे म्हणाली, सध्या पॉर्न साइट्वर अल्पवयीन मुलांचे गँग रेपचे व्हिडिओ जास्त दिसतात. याचं महत्त्वाचं कारण आहे की मुलांना सेक्स एज्युकेशन मिळालेलं नाही. मग यासाठी ते पॉर्न साइट्स आधार घेतात आणि त्यांचा मार्ग भटकतो. अनेकजण चुकीच्या मार्गावर जातात. मी शाळेत असताना आम्हाला सेक्स एज्युकेशन होतं आणि मला वाटतं प्रत्येक शाळेत सेक्स एज्युकेशन आणि डिस्कशन असणं खूप गरजेचं आहे. ज्यामुळे या मुलांची मानसिकता बदलेल. स्वतंत्र दिनाला अभिनेत्री ईशा गुप्तानं केलं ‘हे’ ट्वीट, नेटकरी म्हणाले… ‘सेक्शन 375’मध्ये ऋचा चढ्ढा वकीलाच्या भूमिकेत आगामी सिनेमा ‘सेक्शन 375’मध्ये ऋचा चढ्ढा वकीलाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाची कथा एका रेप विक्टिमवर अधारलेली आहे आणि यातील पीडीतेच्या भूमिकेचं नाव मीरा चोप्रा आहे. तर अभिनेता अक्षय खन्ना या सिनेमात आरोपीच्या वकीलाची भूमिका साकारणार आहे. रिचा या पीडीतेसाठी लढतातना दिसणार आहे. हा सिनेमा 13 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.
अनुष्का शेट्टीसोबतच्या नात्याबद्दल प्रभास म्हणतो, आम्ही दोघंही… ================================================================== भिवंडीत काळजाचा ठोका चुकवणारी रेड्यांची झुंज, पाहा हा VIDEO

)







