Home /News /entertainment /

'सुशांत नाही तर मी केली असती आत्महत्या', आणखी एका अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

'सुशांत नाही तर मी केली असती आत्महत्या', आणखी एका अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

सुशांतच्या आत्महत्येनंतर अनेक स्टार्सनं इंडस्ट्रीमधील आपले चांगले आणि वाईट अनुभवही शेअर करत आहे.

  नवी दिल्ली, 19 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput death) अकस्मित निधनानं सगळ्यांना हादरून सोडलं. सुशांतच्या निधनाला सहा दिवस झाले असले तरी, अजूनही त्यानं हे टोकाचं पाऊल का उचललं याबाबत संभ्रम आहेच. सुशांत हयात नाही, यावर अजूनही काही जणांचा विश्वास नाही आहे. काहींनी सुशांतच्या मृत्यूला बॉलिवूडमधील नेपोटिझमला कारणीभूत ठरवलं आहे तर काहींनी त्याच्यावर मोठ्या निर्मात्यांनी बॅन लावल्याचे म्हटलं आहे. याप्रकरणी मुंबई पोलिस तपास करत आहेत. दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येनंतर अनेक स्टार्सनं इंडस्ट्रीमधील आपले चांगले आणि वाईट अनुभवही शेअर करत आहे. दरम्यान अभिनेता समीर सोनीने सुशांतसिंग राजपूतला आठवत एक धक्कादायक विधान केले आहे. समीर सोनीने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले की, "सुशांतच्या मृत्यूवर मला सांगायचे आहे की मी स्वतः खूप अस्वस्थ आहे. मला माहित आहे, सुशांत नाही तर मी किंवा कोणी आणख्या एक अभिनेत्यानं आत्महत्या केली असती, सर्वांवर दबाव आहे. माझ्या 20 वर्षांच्या कारकीर्दीत मला समजले आहे की देवाने प्रत्येकाला समान संधी दिल्या नाहीत. मग ते बॉलिवूड असो, राजकारण असो किंवा व्यवसाय असो. मी कोणालाही दोष देत नाही, अडचणींचा सामना करणं गरजेचं आहे". समीर सोनीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा-सुशांतच्या निधनाचं दु:ख पचवणं अवघड; त्याच्या लाडक्या कुत्र्यानेही जेवण सोडलं
   
   
   
   
  View this post on Instagram
   
   
   
   

  A post shared by Samir Soni (@samirsoni123) on

  वाचा-संगीत क्षेत्रातूनही लवकरच आत्महत्येचं वृत्त येऊ शकतं समोर; धक्कादायक खुलासा रविवारी मुंबईच्या वांद्रे येथील आपल्या अपार्टमेंटमध्ये 34 वर्षीय सुशांत सिंग राजपूतने गळफास लावून घेतला. असे मानले जाते की सुशांत गेल्या 6 महिन्यांपासून नैराश्यात होता आणि मानसोपचारही त्याच्यावर सुरू होते. सुशांतच्या पर्सनल नोट्स सापडल्या सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याची सुसाइड नोट तर मिळाली नाही पण आता पोलिसांनी या केसबद्दल महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याची माहिती मिळत आहे. टाइम्स नाऊनं दिलेल्या वृत्तानुसार सुशांतच्या घरातून पोलिसांना त्याच्या 5 पर्सनल डायऱ्या सापडल्या आहेत. ज्यात लिहिलेल्या गोष्टींवरून त्याच्या आत्महत्येचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या डायरीमध्ये सुशांत वाचलेल्या पुस्तकांच्या महत्त्वाच्या नोट्स लिहित असे असा दावा एका मीडिया रिपोर्टमध्ये केला गेला आहे. त्यामुळे सुशांतच्या डायरीच्या हिशोबानं आता अनेक जवळच्या व्यक्तीची चौकशी होऊ शकते. वाचा-सुशांतच्या आयुष्यात एक्स गर्लफ्रेंडला होतं महत्त्वाचं स्थान, प्रोड्युसरचा खुलासा संपादन-प्रियांका गावडे.
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  Tags: Sushant Singh Rajput

  पुढील बातम्या