मुंबई,07 नोव्हेंबर : अभिनेता सलमान खान सध्या त्याचा आगामी सिनेमा दबंग 3 च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या सिनेमासाठी सलमान जोरदार तयारी करत आहे. मागच्या काही दिवसांपासून सलमान त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर सतत त्याचे फिटनेस व्हिडिओ शेअर करत आहे. दबंग सीरिज मधील हा 3 रा सिनेमा असून सलमान या सिनेमातही मागच्या दोन्ही सिनेमांप्रमाणंच स्टंट करताना दिसणार आहे. मात्र आता वाढत्या वयात अॅक्शन सीन करणं कठीण जात असल्याचं सलमाननं नुकतंच एका मुलाखाती दरम्यान सांगितलं.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सलमान म्हणाला, या वयात सिनेमांमध्ये अॅक्शन सीन देणं माझ्यासाठी खूप कठीण आहे. अनेकदा माझं वाढतं वय मला त्रास देतं. तसं पाहिलं तर मी पहिल्यापासून अॅक्शन सिनेमे केलेले असल्यानं माझ्या बॉडीला त्याची सवय झाली आहे मात्र काही ठराविक काळानंतर याचा त्रस होतोच. मला प्रत्येक सीन शूट करण्याआधी त्याची 5-6 वेळा रिहर्सल करावी लागते. त्याच अनेका पडतो-आपटतो. प्रत्येक सीन करण्यासाठी एवढी एनर्जी लागते की, तो सीन करता करता मी थकून जातो. पण जोपर्यंत आम्ही जखमी होत नाही तो पर्यंत आम्ही ते करत राहतो. VIDEO : KBC मध्ये पोहोचला चहावाल्याचा मुलगा, कहाणी ऐकून भारावले बिग बी! सलमान पुढे म्हणाला, ‘अनेकदा मला माझ्या वाढत्या वयाचीही भीती वाटते. कारण, आम्हाला नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी वेगळं आणि चांगलं द्यायचं असतं. त्यामुळे तुम्हाला खूप हार्डवर्क करावं लागतं. तुम्ही याठिकणी बेशिस्तपणे वागू शकत नाही.’ याशिवाय कामाचं शेड्युल बीझी असल्यानं सलमान रोज फक्त 2-3 तास झोप घेतो. पण ज्यावेळी त्याला वेळ मिळतो त्यावेळी तो पेटिंग करतो. किंवा मग टीव्ही पाहतो.
सलमान सांगतो, मी जास्त वेळ झोपू शकत नाही. जास्तीत जास्त मी 2-3 तास झोपतो. त्यानंतर मी लिहितो, पेंटिंग करतो, किंवा मग मी टीव्ही पाहतो. अनेकदा मी टीव्ही पाहतो त्यावेळी त्यावर फक्त जाहिराती सुरु असतात VIDEO : …आणि ‘ती’ रणवीर सिंहला म्हणाली, ‘भाभी मत कहना प्लीज’ शाहरुखच्या सिनेमातील आयटम साँगचं शूट करताना रक्तबंबाळ झाली अभिनेत्री! ============================================================================= पश्चिम रेल्वेवर दाखल झालेल्या नव्या लोकलचा पहिला लूक, पाहा VIDEO

)







