Home /News /entertainment /

कतरिनासाठी विकी कौशलने असा केला होता पहिला Instaपोस्ट; VIDEO होतोय VIRAL

कतरिनासाठी विकी कौशलने असा केला होता पहिला Instaपोस्ट; VIDEO होतोय VIRAL

अभिनेता विकी कौशलने (Vicky Kaushal) फारच कमी वेळेत बॉलिवूडमध्ये आपलं एक विशेष स्थान बनवलं आहे. त्याने अनेक हटके भूमिका साकारत चाहत्यांचं मन जिंकलं आहे. आपल्या करिअरमध्ये यश मिळवल्यानंतर आता विकी कौशल आपल्या आयुष्याच्या दुसऱ्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे. ९ डिसेंबर रोजी विकी कौशल बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री कतरिना कैफसोबत (Katrina Kaif) विवाहबंधनात अडकणार आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 8 डिसेंबर-   अभिनेता विकी कौशलने   (Vicky Kaushal)   फारच कमी वेळेत बॉलिवूडमध्ये आपलं एक विशेष स्थान बनवलं आहे. त्याने अनेक हटके भूमिका साकारत चाहत्यांचं मन जिंकलं आहे. आपल्या करिअरमध्ये यश मिळवल्यानंतर आता विकी कौशल आपल्या आयुष्याच्या दुसऱ्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे. ९ डिसेंबर रोजी विकी कौशल बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री कतरिना कैफसोबत  (Katrina Kaif)   विवाहबंधनात अडकणार आहे. तत्पूर्वी विकीची एक इन्स्टाग्राम पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पाहूया काय आहे ती पोस्ट... विकी-कतरिनाच्या लग्ना दरम्यान विकीची एक पोस्ट व्हायरल होत आहे. ही ती पोस्ट आहे जी विकीने पहिल्यांदा कतरिना कैफसाठी केली होती. त्यावेळी अभिनेत्याने कतरिनाला तिचा ब्यूटी kay beauty च्या लॉन्चिंगसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. विकी कौशलने ही पोस्ट आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर २२ ऑक्टोबर २०१९ मध्ये केली होती. अभिनेत्याने कतरिनाचा एक व्हिडीओ शेअर करत लिहिलं होतं. 'खूप खूप अभिनंदन कतरिना कैफ आणि kay beauty साठी खूप साऱ्या शुभेच्छा'. अशी ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
  तसेच कतरिना कैफ आणि विकी कौशल आपल्या कुटुंबासोबत सोमवारी रात्री उशिरा जयपूरमध्ये पोहोचले होते. त्यांनतर कालपासून त्यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. काल अभिनेत्रींच्या हातावर मेहंदी लावण्यात आली आहे. तसेच विकी आणि कतरिनाच्या संगीताचा कार्यक्रमदेखील पार पडला आहे. आज अभिनेत्रीला हळद लागणार आहे.कतरिना कैफला भारतीय संस्कृती विशेष आवडते. तसेच तिला राजस्थानी संस्कृती खूपच आवडते. त्यामुळे तिने लग्नसाठी हे डेस्टिनेशन निवडलं आहे. आणि म्हणूनच ती राजस्थानी पद्धतीने सर्व कार्यक्रम पार पाडत आहे. (हे वाचा:आज कतरिना कैफला लागणार हळद! असा असणार हळदी समारंभ ) उल्लेखनीय आहे की कतरिना कैफ आणि विकी कौशलचा विवाह राजशाही थाटामाटात सिक्स सेन्सेस बरवाडा फोर्ट हॉटेलमध्ये होणार आहे. हा विवाह सोहळा पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात आला आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या विवाह सोहळ्याबाबत जिल्हा प्रशासनही सतर्क आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal

  पुढील बातम्या