Home /News /entertainment /

आज कतरिना कैफला लागणार हळद! असा असणार हळदी समारंभ

आज कतरिना कैफला लागणार हळद! असा असणार हळदी समारंभ

कतरिना कैफला काल मेहंदी लावण्यात आली आहे. तर संगीतचा कार्यक्रमसुद्धा पार पडला. त्यांनतर आक कतरिना आणि विकीचा हळदी समारंभ पार पडणार आहे.

    मुंबई, 8 डिसेंबर-  कतरिना कैफ   (Katrina Kaif)   आणि विकी कौशल  (Vicky Kaushal)  यांच्या लग्नसोहळ्याची   (Katrina-Vicky Wedding)  तयारी आता जोरात सुरू झाली आहे. वधू-वर आणि इतर पाहुणे बरवाडा फोर्ट हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. त्यानंतर आता विवाहाचे कार्यक्रम सुरु झाले आहेत.कतरिना कैफला काल मेहंदी लावण्यात आली आहे. तर संगीतचा कार्यक्रमसुद्धा पार पडला. त्यांनतर आक कतरिना आणि विकीचा हळदी समारंभ पार पडणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री कतरिना आतिफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या लग्नाने सर्वांचीहा उत्सुकता वाढवली आहे. गेली अनेक दिवस हे लग्न खरच होणार आहे कि नाही अशी सर्वांना शंका होती. मात्र परवा दिवशी कतरिना आणि विकी आपल्या कुटुंबासोबत जयपूरला रवाना झाल्यानंतर त्यांच्या लग्नावर शिक्कामोर्तब झाला आहे. मात्र या दोघांनी आपलं लग्न अत्यंत गोपनीय ठेवलं असल्यानं, आतील फोटो किंवा व्हिडीओ अजूनही समोर येऊ शकले नाहीत. मात्र मिळलेल्या अपडेट्स दोघांच्या लग्नाच्याआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. नुकताच समोर आलेल्या माहितीनुसार, आज अभिनेत्रीला हळदी लागणार आहे. अर्थातच आज विकी आणि कतरिनाचा हळदी समारंभ पार पडणार आहे. हा सोहळा अत्यंत पारंपरिक म्हणजेच राजस्थानी थाटामाटात पार पडणार आहे. आज सकाळी ११.३० वाजता अभिनेत्रीला हळद लागणार आहे. तसेच काल कतरिनाच्या हातावर मेहंदी काढण्यात आली आहे. तसेच काल संगीत सेरेमनीसुद्धा पार पडली. त्यांनतर आज हळदी समारंभ होणार आहे. कतरिना कैफला भारतीय संस्कृती विशेष आवडते. तसेच तिला राजस्थानी संस्कृती खूपच आवडते. त्यामुळे तिने लग्नसाठी हे डेस्टिनेशन निवडलं आहे. आणि म्हणूनच ती राजस्थानी पद्धतीने सर्व कार्यक्रम पार पाडत आहे. सोमवारी रात्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल जयपूर विमानतळावर पोहोचले. नंतर पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात ते सवाई माधोपूर जिल्ह्यातील चौथ का बरवाडा शहरात पोहोचले. लग्नाच्या जोडप्याचा ताफा तीन महागड्या कारमधून रात्री ११.१० वाजता चौथ का बरवाडा शहरातील सिक्स सेन्स बारवाडा फोर्ट हॉटेलमध्ये पोहोचला. तेथे हॉटेल व्यवस्थापनाने त्यांचे भव्य स्वागत केले. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. दोघांचेही फुलांचे हार घालून आणि टिळा लावून स्वागत करण्यात आले
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal

    पुढील बातम्या